कोलकाता : हार्दिक पंड्या आणि कपिलदेव यांच्यातील तुलनेबाबत भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याने म्हटले आहे की, ‘कोणीही दुसरा कपिलदेव होऊ शकत नाही.’
पंड्याने केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरोधात पहिल्या कसोटीत कठीण खेळपट्टीवर ९३ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याची आणि कपिलदेव यांची तुलना मोठ्या प्रमाणात केली जाऊ लागली.
अझहरने एका कार्यक्रमात सांगितले की, ‘हे योग्य नाही. कारण दुसरा कपिलदेव होऊ शकत नाही. त्यांनी बराच काळ कर्णधारपददेखील सांभाळले आहे. ते एका दिवसात २० ते २५ षटके गोलंदाजी करू शकत होते. खूपच कमी गोलंदाज हे करू शकतात.’ भारताला दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दोन कसोटीत पराभूत केले होते. मात्र, अखेरच्या सामन्यात भारताने विजय मिळवला. अझहर म्हणाला, ‘गोलंदाजांनी अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेला दबावात ठेवले. दुर्दैवाने भारताला मालिका विजय मिळवता आला नाही. मी संघाच्या विजयाने आनंदित आहे. एकदिवसीय क्रिकेट सामन्यात चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे. भारत मालिका जिंकेल.’