Shubman Gill on Jasprit Bumrah Availability : भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टनच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. २ जुलै पासून रंगणाऱ्या या सामन्याआधी भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल याने पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी त्याने जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की, नाही या प्रश्नावरही उत्तर दिले आहे. त्याने दिलेले उत्तर हे बुमराह टी-२० सामन्यात खेळणार यांची हिंट आहे की, यजमान इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा त्यानं एक माइंडगेम खेळलाय असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जसप्रीत बुमराहसंदर्भात नेमकं काय म्हणाला शुबमन गिल?
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की, नाही? हा प्रश्न सध्या चांगलाच चर्चेत आहे. ज्यावेळी शुबमन गिलला हा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी तो म्हणाला की, जसप्रीत बुमराह निवडीसाठी उपलब्ध असेल. दुसऱ्या कसोटी सामन्यात धावा करण्यासोबत २० विकेट्स घेण्यासाठी प्लॅन आखत आहे. खेळपट्टी पाहिल्यावर जसप्रीत बुमराहला खेळवायचं की, नाही त्यासंदर्भात अंतिम निर्णय घेऊ.\
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
गोलंदाजीत टीम इंडियाकडे चांगला बॅकअप
इंग्लंड दौऱ्यात जसप्रीत बुमराह फक्त ३ सामनेच खेळणार आहे. याबद्दल गिल म्हणाला की, त्याची उणीव भरून काढणं कठीण आहे. पण या दौऱ्यासाठी भारतीय संघात सर्वोत्तम खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. अन्य गोलंदाजांमध्येही चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे.
अतिरिक्त फिरकीपटूसह मैदानात उतरण्याचेही दिले संकेत
इंग्लंडच्या मैदानात बहुतांश दोन फिरकीपटूंना पसंती दिली जाते. पण हवानाम तसे नाही. इथं उन पावसाचा खेळ सुरु आहे. अखेरच्या सामन्यात अतिरिक्त फिरकीपटूची कमी भासली. जर दोन फिरकीपटू असते तर सामन्याचा निकाल वेगळा दिसू शकला असता. जलदगती गोलंदाजाला विकेट मिळत नसेल तर फिरकीपटू किमान धावांवर अंकूश ठेवू शकतो. यामुळे जलदगती गोलंदाजाला छाप सोडण्यात एक संधी मिळू शकते. जर खेळपट्टी हेडिंग्लेसारखी असेल तर दोन फिरकीपटूंचा पर्याय योग्य ठरेल, असे म्हणत त्याने दुसऱ्या कसोटीत दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरण्याचा विचार करत असल्याचेही बोलून दाखवले.