Join us
Daily Top 2Weekly Top 5

डे नाइट कसोटीच्या तिकिटांचा बंपर सेल; स्टेडियम तीन दिवस असणार हाऊसफुल्ल

पहिल्या तिन्ही दिवसांची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. त्यामुळे पहिले तीन दिवस इडन गार्डन्स हाऊसफुल्ल असेल, असे दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 18:18 IST

Open in App

इंदूर : भारतात पहिल्यांद होणाऱ्या डे नाईट कसोटी सामन्याला चाहत्यांनी जबरदस्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आतापर्यंत सामन्याच्या पहिल्या तिन्ही दिवसांची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. त्यामुळे पहिले तीन दिवस इडन गार्डन्स हाऊसफुल्ल असेल, असे दिसत आहे.

याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, " कसोटी क्रिकेटमध्ये काही बदल करणे गरजेचे होते. हे बदल भारतामध्ये मला घडवायचे होते. आता ही गोष्ट मला शक्य झाली आहे. चाहत्यांनीही या प्रयोगाला दमदार प्रतिसाद दिला आहे." 

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील डे नाइट कसोटी 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डनवर हा सामना होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यानं या कसोटीसाठी सर्व तयारी केली आहे. टीम इंडिया आणि बांगलादेशच्या खेळाडूंना गुलाबी चेंडूवर खेळण्याचा पुरेसा सराव मिळावा म्हणून संघांसाठी विशेष रात्रीचे सराव शिबीरही भरवण्यात आले आहे. विराट कोहली आणि अन्य खेळाडू या सामन्यासाठी कसून सराव करत असताना टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात होम हवन करताना पाहायला मिळाले.

भारतीय संघ प्रथमच डे नाइट कसोटी खेळणार आहे आणि या आव्हानाचा टीम इंडियानं यशस्वीपणे सामना करावा यासाठी शास्त्रींनी ही पूजा केल्याचं म्हटलं जात आहे. शास्त्रींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शास्त्री यांच्यासह टीम इंडियाचे गोलंदाज प्रशिक्षक भारत अरूण हेही दिसत आहेत. 

दुसरा सामना कोलकात्यात, पण तरीही टीम इंडिया अजूनही इंदूरमध्येचभारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कोलकाताच्या इडन गार्डनवर होणार आहे. टीम इंडियानं इंदूर येथे झालेल्या पहिल्या सामन्यात एक डाव आणि 130 धावांनी विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतानं पहिली कसोटी अडीच दिवसातच खिशात घातली. दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तरीही भारतीय संघ इंदूरमध्येच आहे.  

टॅग्स :सौरभ गांगुलीबीसीसीआय