Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का

IPL 2026, MI Vs RCB: मुंबई आणि बंगळुरू यांच्यातील लढतीच्या निमित्ताने मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि बंगळुरूचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या हे समोरासमोर आले होते. मात्र एकमेकांविरुद्ध खेळत असताना मैदानात जे काही चित्र दिसलं त्यावरून दोन्ही भावांमध्ये काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 12:39 IST

Open in App

आयपीएलमध्ये रविवारी रात्री झालेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मुंबई इंडियन्सवर १८ धावांनी मात केली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या लढतीत बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २४० धावा काढल्या होत्या. त्यानंतर या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला केवळ २२२ धावांपर्यंतच मजल मारता आली. दरम्यान, या लढतीच्या निमित्ताने मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि बंगळुरूचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या हे समोरासमोर आले होते. मात्र एकमेकांविरुद्ध खेळत असताना मैदानात जे काही चित्र दिसलं त्यावरून दोन्ही भावांमध्ये काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. 

मुंबईची फलंदाजी सुरू असताना हार्दिक पांड्या जेव्हा फलंदाजीस आला तेव्हा कृणाल पांड्या याने त्याचं स्वागत बाऊन्सर टाकून केलं. त्यावर हार्दिकने एकदम शांतपणे प्रतिक्रिया दिली. नेहमी मैदानावर गमती जमती, थट्टा मस्करी करणारे पांड्या बंधू काल एकदम शांतच दिसत होते.

एवढंच नाही तर जेव्हा बंगळुरूच्या जेकब डफी याने हार्दिक पांड्याला बाद केले तेव्हा कृणाल पांड्याने आक्रमकपणे जल्लोष केला. हा व्हिडिओ बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाला. तसेच त्याचा संबंध लोक दोन्ही भावांमध्ये आलेल्या दुराव्याशी जोडू लागले.

सामना संपल्यानंतरही दोन्ही भावांनी एकमेकांना भेटणे आणि हस्तांदोलन करणे टाळले.  दरम्यान, गेल्या महिन्यात झालेल्या टी-२० वर्ल्डकपपासूनच दोन्ही भावांमध्ये सारं काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे विश्वविजेत्या भारतीय संघातील हार्दिक पांड्याचं सर्वजण कौतुक करत होते. मात्र  कृणाल पांड्याने कुठलीही खास प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. त्यात आता काल घडलेल्या प्रसंगामुळे दोन्ही भावांमध्ये दुरावा आल्याच्या चर्चांना बळ मिळत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : IPL feud? Pandya brothers' cold vibes shock fans during MI vs RCB.

Web Summary : During MI vs RCB, Hardik and Krunal Pandya's on-field interactions suggested a rift. Krunal's bouncer and muted celebration after Hardik's dismissal fueled speculation. A post-match handshake was also notably absent, intensifying rumors of discord since the T20 World Cup.
टॅग्स :आयपीएल २०२६मुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरहार्दिक पांड्याक्रुणाल पांड्या