Join us

सचिन तेंडुलकर की ब्रायन लारा? शेन वॉर्नने निवडला त्याचा बेस्ट फलंदाज

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याने आपल्या फिरकीच्या तालावर जगातील भल्याभल्या फलंदाजांना नाचवले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 10:49 IST

Open in App

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याने आपल्या फिरकीच्या तालावर जगातील भल्याभल्या फलंदाजांना नाचवले. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन याच्यानंतर सर्वाधिक विकेट घेणारा वॉर्न ( 708) हा दुसरा गोलंदाज आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याला सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यापैकी कोणाची निवड करशील असा प्रश्न विचारण्यात आला. तेंडुलकर व लारा या महान फलंदाजांनी त्यांचा काळ गाजवला. 

पण, जेव्हा या दोघांपैकी एकाची निवड करण्यास वॉर्नला सांगितले, तेव्हा त्याने तेंडुलकरची निवड केली. 1998 च्या शारजा वन डे सामन्यात तेंडुलकरने आपल्या फलंदाजीने वॉर्नच्या गोलंदाजीची धुलाई केली होती. मात्र, मैदानाबाहेर हे दोघे तितकेच चांगले मित्र आहेत. 

''सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा हे आमच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज होते. कसोटी मालिकेच्या अखेरच्या दिवशी शतक करण्यासाठी कोणाला पाठवायचे असेल तर मी लाराला पाठवेन. पण, तो संपूर्ण दिवस खेळून काढायचा असेल आणि कसोटी विजयासाठी ती खेळी महत्त्वाची असेल, तर मी तेंडुलकरची निवड करेन,''असे वॉर्नने सांगितले.  

टॅग्स :सचिन तेंडुलकरआॅस्ट्रेलिया