ब्रायन लारा हे क्रिकेट विश्वातील एक असे नाव, ज्याने आपल्या फलंदाजीने कधीकाळी अशक्य वाटणारे विक्रमही केले आहेत. लाराने कसोटी सामन्यात 400 धावांची सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम केला आहे. लाराचा हा विक्रम आजपर्यंत कुण्याही फलंदाजाला मोडता आलेला नाही. तो मोडणे तर सोडाच, पण कुणी त्याची बरोबरहीही करू शकलेले नाही. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये असा आणखी एक विक्रम केला आहे, जो चाहत्यांना त्याच्या 400 धावांच्या विक्रमापेक्षाही अधिक कठीण वाटतो.
400 धावांचा विक्रम कायम -
कसोटी सामन्याच्या एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम ब्रायन लाराच्या नावावर आहे. त्याने 2004 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या एका डावात नाबाद 400 धावा केल्या होत्या. एका डावात 400 धावा करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याच्याशिवाय इतर कुठल्याही फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही. लारापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनच्या नावावर होता, ज्याने झिम्बाब्वेविरुद्ध 380 धावा केल्या होत्या.
हा महाविक्रम मोडणे कठीन! -
लारा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10000 धावा पूर्ण करणारा फलंदाज आहे. मात्र, डावाचा विचार करता, सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकाराने लाराची बरोबरी केली आहे. या तिनही दिग्गज फलंदाजांनी 195 डावांत हा पराक्रम केला आहे. मात्र, सामन्यांचा विचार करता, या बाबतीत लारा पहिल्या क्रमांकावर आहे. लाराने 111व्या कसोटी सामन्यात 10000 कसोटी धावांचा टप्पा गाठला, सचिन तेंडुलकरने आपल्या 122 व्या सामन्यात तर संगकाराने 115 व्या कसोटी सामन्यात हा पराक्रम केला आहे.
डावांचा विचार करता सर्वात जलद 10000 कसोटी धावा पूर्ण करणारे टॉप-5 फलंदाज -
ब्रायन लारा - 195
सचिन तेंडुलकर - 195
कुमार संगाकारा - 195
रिकी पॅन्टिंग - 196
राहुल द्रविड - 206
कसोटी सामन्यांचा विचार करता सर्वात जलद 10000 कसोटी धावा पूर्ण करणारे टॉप-5 फलंदाज -
ब्रायन लारा - 111
कुमार संगाकारा - 115
यूनिस खान - 116
रिकी पोंटिंग - 118
राहुल द्रविड - 120