Breaking : आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; लोकेश राहुलला डच्चू

वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरच्या प्रेक्षकांसमोर धुळ चालणारी टीम इंडिया आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 16:42 IST2019-09-12T16:42:19+5:302019-09-12T16:42:40+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Breaking: Team India announces for Test series against South Africa; no place for K L Rahul | Breaking : आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; लोकेश राहुलला डच्चू

Breaking : आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; लोकेश राहुलला डच्चू

मुंबई :  वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरच्या प्रेक्षकांसमोर धुळ चालणारी टीम इंडिया आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. आफ्रिकेचा संघ तीन ट्वेंटी-20 आणि तीन कसोटी सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर आला आहे. 15 सप्टेंबरपासून ट्वेंटी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठीचा ट्वेंटी-20 संघ आधीच जाहीर करण्यात आला आहे. गुरुवारी कसोटी मालिकेसाठीचा संघ जाहीर करण्यात आला. या संघातून अपेक्षितपणे लोकेश राहुलला डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे रोहित शर्माला कसोटीत सलामीला खेळण्याची संधी मिळणार आहे. शिवाय भारत अ संघाकडून दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध दमदार कामगिरी करणाऱ्या शुबमन गिलला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे.

राहुल सातत्याने अपयशी ठरला आहे आणि विंडीज दौऱ्यात त्यानं 4 डावांत 101 धावा केल्या. त्यामुळे त्याच्या जागी आता रोहित शर्माचा सलामीला विचार होऊ शकतो, असे सूचक विधान निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी दिले होते. अजिंक्य रहाणेला गवसलेला सूर ही संघासाठी फार मोठी गोष्ट आहे. शिवाय हनुमा विहारीच्या रुपानं मधल्या फळीत सक्षम पर्याय संघाला मिळाला आहे. गिलने आफ्रिका अ विरुद्धच्या चार दिवसीय सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याने राष्ट्रीय संघात स्थान पटकावले. या मालिकेत हार्दिक पांड्याला स्थान मिळेल अशी शक्यता होती, परंतु तसे झाले नाही. 

भारताचा कसोटी संघ : विराट कोहली, मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, शुबमन गिल.
 

दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघः फॅफ ड्यू प्लेसिस ( कर्णधार), टेंबा बवुमा, थेयूनिस डी ब्रुयन, क्विंटन डी कॉक, डीन एल्गर, झुबायर हम्झा, केशव महाराज, एडन मार्क्राम, सेनुरन मुथूसामी, लुंगी एनगिडी, अॅनरीच नोर्टजे, व्हेर्नोन फिलेंडर, डॅन पिएड्त, कागिसो रबाडा, रुडी सेकंड.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामनाः 2 ते 6 ऑक्टोबर - विशाखापट्टणम, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून
दुसरा सामनाः 10 ते 14 ऑक्टोबर - पुणे, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून
तिसरा सामनाः 19 ते 23 ऑक्टोबर - रांची, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून

Web Title: Breaking: Team India announces for Test series against South Africa; no place for K L Rahul