Sourav Ganguly appointed as 'Director of Cricket' for IPL franchise - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व BCCI चा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीबद्दल मोठी बातमी येत आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली याला इंडियन प्रीमियर लीगमध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. सौरव गांगुली आता आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्समध्ये ( Delhi Capitals) एका महत्त्वाच्या पदावर काम करणार आहे. गांगुलीला दिल्ली कॅपिटल्सच्या क्रिकेटचे नवे संचालक बनवण्यात आले आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदानंतर आता सौरवकडे मोठी जबाबदारी आली आहे.
BREAKING NEWS: जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट्स; श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघात बदल
आयपीएल २०१९मध्ये गांगुली दिल्ली कॅपिटल्सचा मेंटॉर होता, परंतु बीसीसीआयची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्याला ही जबाबदारी सोडावी लागली. पण, आता गांगुली पुन्हा दिल्ली कॅपिटल्ससोबत काम करणार आहे आणि गांगुली-रिकी पाँटिंग ही जोडी पुन्हा दिसणार आहे. पाँटिंग हा दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक आहे. ''त्याने यापूर्वीची फ्रँचायझीसोबत काम केले आहे. त्याचे संघमालकांसोबत चांगले संबंध आहेत आणि आयपीएलमध्ये त्याला जेव्हा केव्हा परतायचे असेल तो दिल्ली कॅपिटल्सकडूनच पुनरागमन करेल,''असे IPL च्या एका अधिकाऱ्याने PTI ला सांगितले.
दिल्ली कॅपटिल्स - रिषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एनरिच नॉर्खिया, डेव्हिड वॉर्नर, ललित यादव, खलील अहमद, लुंगी एनगिडी, चेतन सकारिया, रोव्हमन पॉवेल, एम रहमान, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, सर्फराज खान, प्रविण दुबे, यश धुल, मिचेल मार्श, विकी ओत्स्वाल, रिपल पटेल, अमन खान, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनिष पांडे, रिली रोसोवू.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"