लंडन : वर्ल्ड कप स्पर्धेतील जेतेपदानंतर इंग्लंड संघाने पारंपरिक अॅशेस मालिकेसाठी दंड थोपटले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाने शनिवारी 14 सदस्यीय संघ जाहीर केला. इंग्लंडचा वर्ल्ड कप विजयाचा नायक बेन स्टोक्सला उपकर्णधारपदी बढती मिळाली आहे. वर्ल्ड कपमधील इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज जोफ्रा आर्चरला संघात स्थान देण्यात आले आहे.
जोफ्रानं वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. 24 वर्षीय जोफ्रानं 28 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांत 131 विकेट्स घेतल्या आहेत. जोस बटलर आणि
बेन स्टोक्स यांचे कसोटी संघात पुनरागमन धाले आहे. त्यांना आयर्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. लेव्हीस ग्रेगोरी आणि जॅक लीच यांना विश्रांती देण्यात आली आहे. जीमी अँडरसनही दुखापतीतून सावरत असून तो पहिला सामना खेळण्याची शक्यता आहे.
इंग्लंडचा संघ - जो रूट ( कर्णधार), मोइन अली, जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर, सॅम कुरन, जोए डेन्ली, जेसन रॉय, बेन स्टोक्स, ऑली स्टोनस ख्रिस वोक्स.
अॅशेस मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी - 1 ते 5 ऑगस्ट, एडबॅस्टन, बर्मिंगहॅम
दुसरी कसोटी - 14 ते 18 ऑगस्ट, लॉर्ड्स, लंडन
तिसरी कसोटी - 22 ते 26 ऑगस्ट, हेडिंग्ली, लीड्स
चौथी कसोटी - 4 ते 8 सप्टेंबर, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवी कसोटी - 12 ते 16 सप्टेंबर, ओव्हल, लंडन