बाबर आजमने मोडला ट्वेंटी-२०तील ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड; विराटलाही टाकले मागे

पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आजमने ( Babar Azam) ने आज ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 03:05 PM2024-02-21T15:05:29+5:302024-02-21T15:05:45+5:30

whatsapp join usJoin us
BREAKING: Milestone: Babar Azam becomes the fastest to 10,000 T20 runs. He breaks Chris Gayle's record  | बाबर आजमने मोडला ट्वेंटी-२०तील ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड; विराटलाही टाकले मागे

बाबर आजमने मोडला ट्वेंटी-२०तील ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड; विराटलाही टाकले मागे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आजमने ( Babar Azam) ने आज ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर झाल्मी संघाकडून खेळणाऱ्या बाबरने सहावी धाव घेताच वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १० हजार धावांचा टप्पा त्याने ओलांडला. वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेल याने २८५ इनिंग्जमध्ये ट्वेंटी-२०त दहा हजार धावा केल्या होत्या. बाबरने हा टप्पा २७१ इनिंग्जमध्ये पार केला. विराट कोहलीने २९९ इनिंग्ज आणि डेव्हिड वॉर्नरने  ३०३ इनिंग्जमध्ये ट्वेंटी-२०त १० हजार धावा पूर्ण केल्या होत्या.


कराची किंगविरुद्धच्या आजच्या लढतीपूर्वी बाबरने २७० इनिंग्जमध्ये ९९९४ धावा केल्या होत्या आणि त्याच्या नावावर १० शतकं व ८३ अर्धशतकं नोंदवली गेली आहेत. आज त्याने सहावी धाव घेऊन ट्वेंटी-२०त १० हजार धावा पूर्ण केल्या. 


ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  • ख्रिस गेल ( २००५-२०२२) - ४६३ सामने, १४५६२ धावा, २२ शतकं व ८८ अर्धशतकं
  • शोएब मलिक ( २००५ -२०२४) - ४९४ सामने, १३१५९ धावा, ८३ अर्धशतकं
  • किरॉन पोलार्ड ( २००६-२०२४) - ६५२ सामने, १२६८९ धावा, १ शतक व ५८ अर्धशतकं
  • अॅलेक्स हेल्स ( २००९-२०२४) - ४४१ सामने, १२२०९ धावा, ६ शतकं व ७८ अर्धशतकं
  • डेव्हिड वॉर्नर ( २००७-२०२४) - ३६९ सामने, १२०३३ धावा, ८ शतकं व १०१ अर्धशतकं
  • विराट कोहली ( २००७-२०२४) - ३७६ सामने, ११९९४ धावा, ८ शतकं व ९१ अर्धशतकं
  • आरोन फिंच ( २००९-२०२४) - ३८७ सामने, ११४५८ धावा, ८ शतकं व ७७ अर्धशतकं
  • रोहित शर्मा ( २००७ - २०२४) - ४२६ सामने, १११५६ धावा, ७ शतकं व ७४ अर्धशतकं
  • जोस बटलर ( २००९-२०२४) - ४०३ सामने, १११४६ धावा, ६ शतकं व ८० अर्धशतकं
  • कॉलिन मुनरो ( २०१०-२०२४) - ४२० सामने, १०६४८ धावा, ५ शतकं व ६४ अर्धशतकं
  • जो विन्स ( २०१०-२०२४) - ३७२ सामने, १०२४२ धावा, ५ शतकं व ६५ अर्धशतकं
  • डेव्हिड मिलर ( २००८-२०२४) - ४६६ सामने, १००१९ धावा, ४ शतकं व ४५ अर्धशतकं. 

Web Title: BREAKING: Milestone: Babar Azam becomes the fastest to 10,000 T20 runs. He breaks Chris Gayle's record 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.