Join us

Breaking : दानुष्का गुणथिलकाचे हे वर्ष जेलमध्येच जाणार! सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून हकालपट्टी

श्रीलंकेचा आघाडीचा फलंदाज दनुष्का गुणतीलकाला बलात्काराच्या प्रकरणात सिडनी पोलिसांनी अटक केली. या अटकेमुळे टी २० वर्ल्डकपमध्ये खळबळ उडाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 15:18 IST

Open in App

श्रीलंकेचा आघाडीचा फलंदाज दनुष्का गुणतीलकाला बलात्काराच्या प्रकरणात सिडनी पोलिसांनी अटक केली. या अटकेमुळे टी २० वर्ल्डकपमध्ये खळबळ उडाली. श्रीलंकेच्या टीमने शनिवारी इंग्लंडविरोधात वर्ल्डकपमधील अखेरचा सामना खेळला होता. या मॅचनंतर काही वेळातच पोलिसांनी गुणतीलकाला अटक केली. आता श्रीलंका क्रिकेट बोर्डने दनुष्का याच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.  (Danushka Gunathilaka Rape Case)

Danushka Gunathilaka Rape Case : डेटिंग अ‍ॅपवर ओळख, मग रूममध्ये बलात्कार! श्रीलंकन खेळाडूचा ऑस्ट्रेलियात प्रताप; जाणून घ्या डिटेल्स

 श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दुनुष्का याची सर्व क्रिकेट फॉरमॅटमधून हकालपट्टी केली आहे. श्रीलंका क्रिकेट कार्य समितीने हा निर्णय घेतला. एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुनाथिलका याला ऑस्ट्रेलियात अटक करण्यात आली होती. त्याचा आता पुढच्या निवडीसाठी विचार केला जाणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. 

जानेवारी २०२३ मध्ये न्यायालयात हजर होईपर्यंत सिडनीमध्ये जामीन नाकारल्यानंतर दानुष्का गुनाथिलका उर्वरित वर्ष जेलमध्ये रहावे लागू शकते.  न्यू साउथ वेल्सच्या सर्वोच्च न्यायालयात तातडीची जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे.

श्रीलंका क्रिकेट या कथित गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी आवश्यक पावले उचलणार आहे. यात तो दोषी आढळल्यास शिक्षा होईल. श्रीलंका बोर्ड ऑस्ट्रेलियाला या संदर्भात तपास करण्यासाठी सहाय्य करेल, असंही बोर्डाने म्हटले आहे. 

दनुष्क गुणतीलका याच्यावर आरोप काय? 

३१ वर्षाच्या दनुष्काने ऑस्ट्रेलियातील २९ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. दनुष्क आणि या महिलेची ओळख एका ऑनलाईन डेटींग अॅपवर झाली. या दोघांनी एका हॉटेलमध्ये भेटायचे ठरवले. २ नोव्हेंबर रोजी त्याने या महिलेला हॉटेलमधील एका रुममध्ये भेटायला बोलवले. आणि तिथे जबरदस्ती बलात्कार केल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे.  

पोलिसांनी तपासानंतर दनुष्काला अटक केली आहे.तपासादरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही तापासले आहेत. सिडनी येथील ससेक्स स्ट्रीट हॉटेलमधून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी दनुष्काला कस्टडीमध्ये ठेवले असून त्याच्या जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता.पण, जामीन नाकारण्यात आला आहे. (Danushka Gunathilaka Rape Case)

टॅग्स :श्रीलंकाआॅस्ट्रेलिया
Open in App