बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये गुरुवारी पाकिस्तानी फलंदाज इफ्तिखार अहमद ( Iftikhar Ahmed) याने शाकिब अल हसनसह फॉर्च्युन बरिशाल संघाकडून खेळताना रंगपूर रायडर्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. डावातील सहाव्या षटकात शाकिब अल हसन फलंदाजीला आला अन् त्याने इफ्तिखारसह वादळी खेळी करताना ६७ धावांनी विजय पक्का केला. शाकिब आणि इफ्तिखार यांनी पाचव्या विकेटसाठी १९२ धावांची विक्रमी भागीदारी केली. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पाचव्या विकेटसाठीची ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. अॅडम होसे व डॅन मौस्ली यांनी २०२०च्या व्हिटालिटी ब्लास्टमध्ये १७१ धावांची भागीदारी केली होती.
शाकिब व इफ्तिखार यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर फॉर्च्युनने ४ बाद २३८ धावा केल्या. रायडर्सला २० षटकांत १७१ धावा करता आल्या. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर शतक झळकावणारा इफ्तिखार हा पहिला आशियाई फलंदाज ठरला आहे. यापूर्वी डेवीड मलान ( इंग्लंड), राकेप पटेल ( केनिया), आंद्रे रसेल ( वेस्ट इंडिज, दोनवेळा), डॅन ख्रिस्तियन ( ऑस्ट्रेलिया), शाहेरयार बट व साबेर झखिल ( बेल्जियम) यांनी हा पराक्रम केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"