Join us  

इतिहासाची पानं : कसोटी क्रिकेटमध्ये पहिली 'Tie' मॅच कधी झालेली माहितेय?

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्यापैकी अनेकांना माहित नसतील. आतापर्यंत इंग्लंड असा एकमेव संघ आहे की त्यांनी हजार ( 1018) कसोटी सामने खेळण्याचा मान पटकावला आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: December 15, 2019 1:55 PM

Open in App

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्यापैकी अनेकांना माहित नसतील. आतापर्यंत इंग्लंड असा एकमेव संघ आहे की त्यांनी हजार ( 1018) कसोटी सामने खेळण्याचा मान पटकावला आहे. आतापर्यंत 4748 कसोटी सामने खेळवण्यात आलेत आणि त्यापैकी 3210 सामन्यांचे निकाल लागले आहेत, तर 1528 सामने अनिर्णीत सुटले आहेत. जवपास साडेचार हजाराहून अधिक सामन्यांत केवळ दोन सामने बरोबरीत सुटलेट ( Tie) हे तुम्हाला माहित नसेल आणि या दोन्ही टाय सामन्यात एक संघ समान आहे. आज आपण क्रिकेटच्या 'इतिहासाची पानं' या लेखातून पहिल्या Tie सामन्याबाबत जाणून घेऊया.

1876/77 मध्ये पहिली कसोटी सामना खेळवण्यात आली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा मान ऑस्ट्रेलियानं पटकावला आहे. त्यांनी 828पैकी 390 सामने जिंकले आहेत. त्यापाठोपाठ इंग्लंड ( 368), वेस्ट इंडिज ( 174), दक्षिण आफ्रिका ( 164), भारत ( 157) आणि पाकिस्तान ( 136) यांचा क्रमांक लागतो. पण, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या Tie सामना होण्यासाठी 1960 साल उजाडले.

9 ते 14 डिसेंबर 1960 या कालावधीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज असा कसोटी सामना खेळवण्यात आला आणि कसोटी क्रिकेटमधील हा पहिला Tie सामना ठरला. ब्रिसबन क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी सहा धावा हव्या होत्या आणि तीन फलंदाज हाताशी होते. विंडीजनं हे तीनही फलंदाज बाद करून ऑसींचा डाव गुंडाळला, परंतु ऑसींना हा सामना बरोबरीत सोडवण्यात यश आलं. 

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजनं 453 धावा चोपल्या. गॅरी सोबर्स यांनी 174 चेंडूंत 21 चौकारांसह 132 धावा केल्या. त्यांना कर्णधार सर फ्रँक वोरेल (65), जोए सोलोमोन ( 65), गेरी अलेक्सझँडर ( 60) आणि सर वेस हॉल ( 50) यांनी अर्धशतकी खेळी करून दमदार साथ दिली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियानं 505 धावांचा डोंगर उभा केला. कॉलीन मॅकडोनाल्ड ( 57) आणि बॉब सिम्पसन ( 97) यांच्या धडाकेबाज सुरुवातीनंतर नॉर्म ओ'नेल यांची खणखणीत दीडशतक झळकावलं. त्यांनी 401 चेंडूंत 22 चौकारांच्या मदतीनं 181 धावा केल्या. ऑसींनी पहिल्या डावात 52 धावांची आघाडी घेतली.

विंडीजनं दुसऱ्या डावात 284 धावा केल्या. रोहन कन्है ( 54) आणि वोरेल ( 65) यांनी संयमी खेळ केला. ऑसींच्या अॅलन डेव्हीडसन यांनी 87 धावांत 6 फलंदाज बाद केले. 233 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑसींचा निम्मा संघ 57 धावांत माघारी परतला होता. पण, डेव्डीडसन आणि कर्णधार रिची बेनौड यांनी संघाला विजयपथावर आणलं. या दोघांनी सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.  बेनौड 52 धावा करून माघारी परतले. त्यानंतर ऑसींना विजयासाठी 6 धावांची गरज असताना ऑसींची तीन फलंदाज धावबाद झाले आणि हा सामना Tie राहिला. डेव्हीडसन 194 चेंडूंचा सामना करून 80 धावांवर नाबाद राहिले. कसोटी क्रिकेट इतिहासातील तो पहिला Tie सामना होता. त्यानंतर 18 सप्टेंबर 1986 मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना बरोबरीत सुटला होता.

टॅग्स :आयसीसीवेस्ट इंडिजआॅस्ट्रेलिया