मुंबई - कावेरी पाणी विवादानंतर मिळालेल्या धमक्यांमुळे चेन्नई येथून पुण्यात हलवण्यात आलेल्या आयपीएलच्या सामन्यांचे आयोजन संकटात सापडले आहे. आयपीएलच्या सामन्यांसाठी पवना धरणातील पाणी वापरू देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यत मनाई केली आहे. त्यामुळे आधीच चेन्नईतून पुण्यात हलवण्यात आलेल्या आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्जच्या सामन्यांवर नवे संकट उभे राहिले आहे.
कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून पेटलेल्या वादानंतर चेन्नई सुपरकिंग्जचे चेन्नईत होणारे सामने चेन्नईतून हलवण्यात आले होते. त्यानंतर चेन्नईचे सामने पुण्यातील गहुंजे येथील स्टेडियमवर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.