Join us  

"मी इरफान पठाणला ५ वर्ष डेट केलं, तेव्हा गौतम गंभीर...", बॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष तिच्या भन्नाट पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 5:00 PM

Open in App

Payal Ghosh On Irfan Pathan : बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष तिच्या भन्नाट आणि हास्यास्पद पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. वन डे विश्वचषकादरम्यान तिने मोहम्मद शमीला लग्नासाठी प्रपोज करून प्रसिद्धी मिळवली. आता पुन्हा एकदा ती तिच्या पोस्टमुळे चर्चेत आली असून तिने भारतीय खेळाडूंविषयी मोठा खुलासा केला आहे. तसेच भारताचा वेगवान गोलंदाज इरफान पठाणसोबत मी पाच वर्ष रिलेशनशिपमध्ये होती, असा दावा तिने केला. याशिवाय पठाणसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मी आजारी झाली होती, पुढील काही वर्षे काम देखील करू शकली नव्हती, असेही पायलने सांगितले. 

पायलने पोस्टच्या माध्यमातून म्हटले, "मी २०११ पासून पाच वर्ष इरफान पठाणला डेट केलं. गौतम गंभीर आणि अक्षय कुमार देखील माझ्याशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात होते. पण मी फक्त इरफानवर प्रेम केलं. मी इरफानला सर्वकाही सांगितलं होतं. किंबहुना गंभीरने मला दिलेले मिस्ड कॉलही त्याला दाखवले. त्यावेळी त्याचा भाऊ युसूफ पठाण, हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्या हे देखील होते. पुण्यात डॉमेस्टिक क्रिकेट सामना सुरू असताना आमची ही भेट झाली होती."

आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या पायल घोषने अलीकडेच मोहम्मद शमीला थेट लग्नाची मागणी घातली होती. शमीबरोबर लग्न करण्यासाठी तयार असल्याचे पायलने म्हटले. तिने शमीपुढे लग्नासाठी एक अटही ठेवली. "शमी तुझं इंग्लिश सुधार, मी तुझ्याबरोबर लग्नासाठी तयार आहे", अशी पोस्ट पायलने केली. २ नोव्हेंबरला भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यादरम्यान ही पोस्ट पायलने केली होती. 

टॅग्स :इरफान पठाणपायल घोषबॉलिवूडगौतम गंभीरसेलिब्रिटी