IND vs AUS : ...अन् आशा भोसले यांच्या हातातला कप शाहरुखने उचलला; हृदयस्पर्शी व्हिडीओनं जिंकली मनं

ind vs aus final : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 19:31 IST2023-11-19T19:28:15+5:302023-11-19T19:31:51+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
bollywood actor Shah Rukh Khan's SWEET gesture for Asha Bhosle during IND vs AUS Final match goes viral on social media  | IND vs AUS : ...अन् आशा भोसले यांच्या हातातला कप शाहरुखने उचलला; हृदयस्पर्शी व्हिडीओनं जिंकली मनं

IND vs AUS : ...अन् आशा भोसले यांच्या हातातला कप शाहरुखने उचलला; हृदयस्पर्शी व्हिडीओनं जिंकली मनं

icc odi world cup 2023 final | अहमदाबाद : वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांनी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हजेरी लावली. क्रिकेटपटूंच्या पत्नी देखील भारतीय खेळाडूंना चीअर करताना दिसल्या. बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती लक्षणीय राहिली. अभिनेता शाहरूख खान देखील ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अहमदाबादला पोहचला. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये सेलिब्रेटींची झलक चाहत्यांचा उत्साह वाढवणारी होती. शाहरूख खान प्रेक्षक गॅलरीत गायक आशा भोसले आणि बीसीसीआय सचिव जय शहांसोबत दिसला.

दरम्यान, आशाताई आणि शाहरूख यांच्या गप्पा रमल्या असताना एक हृदयस्पर्शी घटना घडते, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. खरं तर आशा भोसले यांच्या हातातला कप शाहरूखने उचलला अन् चाहत्यांची मनं जिंकली. शाहरूखच्या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून चाहते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे. 

उद्योगपती हर्ष गोएंका यांनी देखील शाहरूखचा हा व्हिडीओ शेअर करत हृदयस्पर्शी थरार असल्याचा दाखला दिला.

Web Title: bollywood actor Shah Rukh Khan's SWEET gesture for Asha Bhosle during IND vs AUS Final match goes viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.