Join us

शरीर थकलेलं, क्रॅम्पचा त्रास होत असूनही विराट शेवटच्या चेंडूपर्यंत खेळला

विराटचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे त्याचा फिटनेस. सध्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक पाहता विराट ज्या पद्धतीने स्वत:ला फिट ठेवतोय ते खरोखरच कौतुकास्पद आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 14:51 IST

Open in App
ठळक मुद्देविराट 34 व्या शतकाच्या समीप असताना संघर्ष करताना दिसत होता. कोणीतरी डावाच्या शेवटपर्यंत फलंदाजी करण्याची आवश्यकता होती, तशी फलंदाजी मला करता आली याचा आनंदच आहे.

केपटाऊन - भारताने काल दक्षिण आफ्रिकेवर 124 धावांनी दणदणीत विजय मिळवून सहा सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली. भारताच्या या विजयात मोलाचे योगदान आहे ते 159 चेंडूत नाबाद 160 धावा फटकावणा-या कर्णधार विराट कोहलीचे. कारकिर्दीतील 34 वे शतक झळकावणा-या विराटमुळेच भारताला 300 धावांची मजल मारता आली. विराटच्या या परफॉर्मन्समुळेच भारत पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत मालिका विजयाच्या उंबरठयावर उभा आहे. 

विराटचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे त्याचा फिटनेस. सध्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक पाहता विराट ज्या पद्धतीने स्वत:ला फिट ठेवतोय ते खरोखरच कौतुकास्पद आहे. लागोपाठ दौरे करताना विराटने फिटनेसच्या कारणास्तव माघार घेतली असे अपवादानेच घडलेय. काल न्यूलँडसच्या मैदानावर खेळताना विराट 34 व्या शतकाच्या समीप असताना संघर्ष करताना दिसत होता. त्याला हातामध्ये येणा-या क्रॅम्पचा त्रास होत होता. त्याही परिस्थितीत विराट मैदानावर टिकून राहिला त्याने 160 धावांच्या खेळीत 12 चौकार आणि दोन षटकार ठोकले.  

प्रत्येक शतक हे खास असतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावा करण सोप नसतं. कोणीतरी डावाच्या शेवटपर्यंत फलंदाजी करण्याची आवश्यकता होती. तशी फलंदाजी मला करता आली याचा आनंदच आहे. नव्वद धावा झाल्यानंतर क्रॅम्पमुळे मला त्रास जाणवत होता. जेव्हा तुम्ही पूर्णवेळ संघाबद्दल विचार करता तेव्हाच आश्चर्यकारक गोष्टी घडतात.  शरीराची एक मर्यादा असते त्या पलीकडे जाऊन संघासाठी योगदान देता आले याचा मला आनंद वाटत आहे असे विराटने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले. 

धावून बनवले 100 रन्स160 नाबाद रन्सच्या शानदार खेळीतील 100 रन्स विराटने धावून बनविले. भारतीय बॅट्समनने धावून 100 रन्स बनविणं पहिल्यांदाच झालं आहे. 160 रन्समध्ये कोहलीने 75 सिंगल्स, 11 डबल आणि 1 वेळा तीन रन धावून काढले. भारताकडून याआधी सौरव गांगुलीने 1999मध्ये 130 रन्समधील 98 रन्स धावून बनविले होते. वनडे क्रिकेटमध्ये धावून सर्वात जास्त रन्स बनविण्याचा रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या गॅरी कर्स्टनच्या नावे आहे. त्याने 1996मध्ये युएईच्या विरोधात 188 रन्सच्या खेळीत 112 रन्स धावून बनविले आहेत.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८