बंगळुरू - आजपासून सुरु झालेल्या अंधांच्या द्विपक्षीय आणि त्रिकोणीय आंतरराष्ट्रीय अंध क्रिकेट मालिकेमधल्या पहिल्या T20I सामन्यामध्ये नाणेफेक जिंकत इंग्लंड संघाने फलंदाजी घेऊन २० ओव्हर्समध्ये ७ बाद १५० धाव केल्या. हे आव्हान भारतीय संघाने अगदी लीलया पेलत अवघ्या १२.३ ओव्हर्समध्ये फक्त ३ गडी गमावून १५२ धावा करून पूर्ण केले. यामध्ये सुनील रमेश ने १०८ धावा तर नकूलने २७ धावांचे योगदान देऊन संघाच्या विजयात मोठा हातभार लावला. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत विजयी सलामी दिली.