कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात एखादा फलंदाज अशा विचित्र पद्धतीने रन आउट होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 18:47 IST2025-06-09T18:29:44+5:302025-06-09T18:47:55+5:30

whatsapp join usJoin us
Bizarre Run out In MPL 2025 Stumps Shattered At One End But Batter Dismissed At Non Strike End Watch Viral Video | कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Bizarre Run out In MPL 2025 Video Goes Viral : आयपीएल स्पर्धेनंतर राज्यात लोकल टी-२० लीगचा थरार पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीगमधील पुरुषांच्या गटातील रायगड रॉयल्स आणि पुणेरी बाप्पा यांच्यातील सामन्यात एक खेळाडू अजब गजब रन आउट झाल्याचे पाहायला मिळाले. विकेट किपरनं स्ट्राइक एन्डच्या स्टंपवर अचूक नेम धरला.  ऑफ स्टंपला लागून हा चेंडू  दुसऱ्या बाजूच्या स्टंपवर जाऊन आदळला. त्यामुळे स्ट्राइक एन्डच्या फलंदाजाला बाद करण्यासाठी खेळलेल्या डावात नॉन स्ट्राइक एन्डचा फलंदाज फसल्याचे पाहायला मिळाले. क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात एखादा फलंदाज अशा विचित्र पद्धतीने रन आउट होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

पहिल्याच षटकात रायगड संघाने रन आउटच्या रुपात गमावली विकेट  

महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेतील सहावा सामना रायगड रॉयल्स आणि पुणेरी बाप्पा यांच्यात रंगला होता. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात पुणेरी बाप्पा संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात २०२ धावा करत रायगड रॉयल्ससमोर २०३ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी सिद्धेश वीर आणि मोगविरा या जोडीनं रायगड रॉयल्स संघाच्या डावाची सुरुवात केली. पुणेरी बाप्पा संघाकडून पहिले षटक घेऊन आलेल्या  रामकृष्ण घोष याच्या पाचव्या चेंडूवर रायगडच्या संघाला रन आउटच्या रुपात पहिला धक्का बसला. 

नेमकं काय घडलं?


रायगडचा सलामीवीर सिद्धेश याने रामकृष्ण घोषच्या पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर लेग साइडच्या दिशेला चेंडू टोलवल्यावर एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पुणेरी बाप्पाचा विकेट किपर सूरज शिंदे याने चपळाई दाखवत चेंडू स्ट्राइक एन्डच्या स्टंपवर मारला. धाव घेण्यास नकार देत सिद्धेश वीर सुरक्षित क्रीजवर पोहचला होता. पण त्यानंतर क्षणात जे घडलं ते मॅजिक वाटावं असंच होते.  स्ट्राइक एन्डंच्या स्टंपवर लागलेल्या चेंडूनं दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राइक एन्डच्या दिशेनं गेला अन् तिकडची स्पंपही पडली. यावेळी मोगावीरा क्रीज बाहेर असल्यामुळे त्याच्यावर रन आउट होण्याची नामुष्की ओढावली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. 
 

Web Title: Bizarre Run out In MPL 2025 Stumps Shattered At One End But Batter Dismissed At Non Strike End Watch Viral Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.