Join us  

फायनलच्या आधी मोठी अपडेट! वॉशिंग्टन सुंदर तातडीने श्रीलंकेला रवाना, 'या' खेळाडूची माघार?

IND vs SL Asia Cup Final : वॉशिंग्टन सुंदरच्या आजच भारतीय संघासोबत सामील होणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 12:28 PM

Open in App

Washington Sundar, IND vs SL Asia Cup Final : आशिया कप 2023 चा अंतिम सामना रविवारी यजमान श्रीलंका आणि भारत यांच्यात होणार आहे. त्याआधी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याला तातडीने श्रीलंकेत कोलंबोमध्ये दाखल होण्यास सांगितले आहे. त्यानंतर त्याच्या विमानाने उड्डाण केले असून तो लवकरच संघात सामील होणार आहे. सुंदरला रविवारी होणाऱ्या फायनलच्या सामन्यात संघात खेळण्याची संधी मिळू शकते अशी चर्चा आहे. भारतीय क्रिकेट संघासाठी वाईट बातमी म्हणजे, संघाचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल (Axar Patel) अंतिम सामन्यातून माघार घेऊ शकतो. त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा प्लेईंग इलेव्हन मध्ये समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

अक्षर पटेलला काय झाले?

शुक्रवारी बांगलादेशविरुद्धच्या सुपर-4 फेरीच्या सहाव्या सामन्यात अक्षरला दुखापत झाली होती. याबद्दल अधिक माहिती अद्याप कळलेली नाही. पण सुंदरला श्रीलंकेत तातडीने बोलावण्यात आले. क्रिकबझमधील एका वृत्तानुसार, 23 वर्षीय सुंदरला अक्षरचा बॅक-अप खेळाडू म्हणून श्रीलंकेत बोलावण्यात आले आहे. सुंदर फायनल खेळेल, असे मानले जात आहे. सुंदर हा ऑफब्रेक गोलंदाजी करतो आणि डावखुरा फलंदाजही आहे. त्यामुळे अक्षरच्या जागी तो संघात फिट बसेल अशी आशा आहे.

या वर्षी जानेवारीत तो शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तो संघाचा भाग होता. पण भारताच्या १५ सदस्यीय एकदिवसीय विश्वचषक २०२३ संघाचा सुंदर सध्या तरी भाग नाही.

टॅग्स :एशिया कप 2023वॉशिंग्टन सुंदरभारत विरुद्ध श्रीलंकाअक्षर पटेल