Join us  

Big News : युवराज सिंग निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याच्या तयारीत, जाणून घ्या कोणत्या संघाकडून ट्वेंटी-20 खेळणार

युवीनं त्यासाठी बीसीसीआयला पत्र पाठवले आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 6:58 PM

Open in App

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) निवृत्तीचा विचार मागे घेण्याच्या तयारीत आहे. 2019मध्ये युवराजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह देशातील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर तो ग्लोबल ट्वेंटी-20 कॅनडा लीगमध्ये खेळला होता. आता तो पुन्हा पंजाबकडून ट्वेंटी-20 क्रिकेट खेळताना दिसू शकतो.   

IPL 2020त कोण दाखवणार दम?; 8 संघांच्या खेळाडूंची संपूर्ण लिस्ट एका क्लिकवर!

कोरोना व्हायरसच्या काळात युवी मागील काही महिन्यांपासून मोहाली येथील पीसीए स्टेडियमवर शुबमन गिल, अभिषेक शर्मा, प्रभसिम्रन सिंग आणि अनमोलप्रीत सिंह यांच्यासह क्रिकेटच्या सराव केला होता. ''या युवा खेळाडूंसोबत सराव करताना मजा आली आणि त्यांना या खेळाचे अनेक बारकावे समजावून सांगितले. मी सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी त्यांनी आत्मसातही केल्या. त्यांच्यासोबत नेट्समध्ये सराव केला आणि स्वतःची फटकेबाजी पाहून मलाच आश्चर्य वाटले. बऱ्याच कालावधीनंतर मी हातात बॅट घेतली होती.'' 

RCBसाठी 'देवदत्त' धावून येणार; IPL 2020त विराट कोहलीचा हुकमी एक्का सर्वांची बोलती बंद करणार! 

सुरेश रैनाचे दोन मोठे विक्रम IPL 2020मध्ये रोहित शर्मा अन् विराट कोहली मोडणार!

लॉकडाऊनच्या नियमात सूट मिळाल्यानंतर युवीनं गोल्फ आणि टेनिसचा सराव केला. तो पुढे म्हणाला,''या दोन महिन्यांत मी कसून सराव केला आणि फलंदाजीचाही सराव केला. सराव सामन्यांत काही धावाही चोपल्या. पंजाब क्रिकेट असोसिएशनचे सचिव पुनीत बाली यांनी मला निवृत्तीचा विचाराबद्दल पुन्हा विचार करण्यास सांगितले.''  तो पुढे म्हणाला,''हा प्रस्ताव मान्य करायचा की नाही, याबाबत मी अजूनही संभ्रमात आहे. मी स्थानिक क्रिकेटमध्ये खेळलो आहे, त्यामुळे मला आता जगभरातील लीगमध्ये खेळायचे आहे. पण, मला बाली यांच्या विनंतीकडे दुर्लक्षही करायचे नाही.''  

युवराज सिंगची आंतरराष्ट्रीय कामगिरी

2012नंतर युवी भारतीय संघाचा नियमित सदस्य होता. त्यानंतर त्यानं तीन ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळले, परंतु वन डे वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवण्यात तो अपयशी ठरला. 2014-15च्या मोसमात युवीनं रणजी करंडक स्पर्धेत सलग तीन शतकं झळकावली, तरीही 2015च्या वन डे वर्ल्ड कपसाठीच्या संघात त्याचा विचार केला गेला नाही. 2017मध्ये त्यानं कमबॅक केलं, परंतु सात महिन्यांनंतर त्याला वगळले गेले. याकाळात त्यानं 11 वन डे व 3 ट्वेंटी-20 सामने खेळले.  युवीनं 304 वनडे सामन्यांत 8701 धावा आणि 111 विकेट्स घेतल्या.  58 ट्वेंटी-20 सामन्यांत 1177 धावा आणि 28 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. त्यानं 40 कसोटी सामन्यांतही प्रतिनिधित्व केलं. 

युवराज सिंग देणार 'मोठं' सप्राईज; 'सिक्सर किंग'ची चाहत्यांना सुखावणारी बातमी!

बीसीसीआयनं माझ्याशी असं वागायला नको होतं; युवराज सिंगनं व्यक्त केली खंत

कॅन्सरवर यशस्वी मात करून युवराज सिंगनं 2017मध्ये वन डे संघात पुनरागमन केलं. त्यानंतर 2019च्या वर्ल्ड कप पर्यंत चौथ्या स्थानावर सक्षम पर्याय मिळेपर्यंत युवीचा विचार व्हायला हवा होता, असे अनेकांचे मत होते. शिवाय भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर त्यानं 41.33 च्या सरासरीनं धावाही केल्या होत्या, परंतु तंदुरुस्तीच्या समस्येमुळे त्याला संघातील स्थान गमवावे लागले.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर युवीला yo-yo टेस्ट पास करता आली नाही आणि त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून वगळण्यात आले. बीसीसीआयनं त्याला निवृत्तीच्या सामन्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु युवीनं तो अमान्य केला. पण, युवीनं yo-yo टेस्ट पास केल्यानंतरही संघ व्यवस्थापनानं त्याला निवडले नाही. 2019मध्ये युवीनं निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीनंतर युवीनं बीसीसीआयवर जोरदार टीका केली.

 38 वर्षीय युवीनं सांगितलं की,''माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात बीसीसीआयनं अव्यावसायिक पद्धतीनं वागणूक दिली. पण, हे असं केवळ माझ्यासोबच नाही घडलं. हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान यांच्यासोबतची तसेच घडले. त्यामुळे भारतीय क्रिकेटचा हा एक भागच आहे, असं म्हणावं लागेल. मागे वळून पाहताना अशी अनेक उदाहरणं दिसतील.''

 

 

टॅग्स :युवराज सिंगपंजाब