Join us

मोठी घोषणा: आंद्रे रसेलच्या खांद्यावर 'रॉयल्स' संघाचे नेतृत्व

वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज आंद्रे रसेल याच्या खांद्यावर 'रॉयल्स' संघानं नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याची मोठी घोषणा मंगळवारी करण्यात आली. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 17:44 IST

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमाची लगबग सुरू झाली आहे. येत्या 19 डिसेंबरला कोलकाता येथे आयपीएल 2020साठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावात एकूण 971 खेळाडू नशीब आजमावणार आहे. यामध्ये 713 भारतीय आणि 258 परदेशी खेळाडूंचा समावेश असलेल्या या लिलाव प्रक्रियेत केवळ 73 खेळाडूंनाच लॉटली लागणार आहे. आठ संघांमध्ये ही चुरस रंगणार आहे. आयपीएलच्या पुढील मोसमाला सुरुवात होण्यापूर्वी मंगळवारी एक मोठी बातमी समोर आली आहे. वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज आंद्रे रसेल याच्या खांद्यावर 'रॉयल्स' संघानं नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याची मोठी घोषणा मंगळवारी करण्यात आली. 

बांगलादेश प्रीमिअर लीगच्या सातव्या मोसमाला बुधवारपासून सुरुवात होत आहे. चत्तोग्राम चॅलेंजर्स, कुमिल्ला वॉरियर्स, ढाका प्लॅटून, खुल्ना टायगर्स, राजशाही रॉयल्स, रंगपूर रेंजर्स आणि सिल्हेत थंडर्स अशा सात संघांचा समावेश आहे. 11 डिसेंबर ते 17 जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. या लीगमध्ये देशभरातील अनेक खेळाडूंचा समावेश असणार आहे. युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलही या लीगमध्ये चॅलेंजर्स संघाकडून खेळणार आहे. त्याच्याशिवाय कुसल परेरा, थिसारा परेरा, रिली रोसोव, रवी बोपारा, हझरतुल्लाह जाझई, मोहम्मद नबी आदी काही प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे.

या लीगमधील राजशाही रॉयल्स संघाचे नेतृत्व आंद्रे रसेलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्स, इस्लामाबाद युनायटेड, जमैका थल्लावाह, कोलकाता नाइट रायडर्स, मुल्ताक सुल्तान, सीडनी थंडर्स, राजशाही रॉयल्स, व्हॅकोवर नाइट, वॉर्कसेस्टरशायर आदी संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा अनुभव रसेलकडे आहे. त्यानं जवळपास 306 ट्वेंटी-20 सामन्यांत 2 शतकं व 17 अर्धशतकांसह 5065 धावा केल्या आहेत, तर 276 विकेट्स घेतल्या आहेत. 

टॅग्स :टी-20 क्रिकेटवेस्ट इंडिजबांगलादेश