Join us  

Big News : एबी डिव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी करतोय तयारी!

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाकडून तुफान फटकेबाजी करणारा एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 7:30 AM

Open in App

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाकडून तुफान फटकेबाजी करणारा एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. यंदा भारतात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची तयारी त्यानं दर्शवली आहे. याबाबत तो दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक मार्क बाऊचर याच्याशी चर्चा करणार आहे. ''आयपीएल सुरू असताना माझी त्यांच्याशी चर्चा झाली. त्यात माझ्या खेळण्याचाही विषय निघाला,''असे एबीनं सांगितलं. मे २०१८मध्ये एबीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.  Mr. 360ची लव्ह स्टोरी!; 'Taj Mahal' समोर गुडघ्यावर बसून एबी डिव्हिलियर्सन केलं प्रपोज!

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या विजयानंतर एबी म्हणाला,''मागच्या वर्षी त्यानं मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी उत्सुक आहेस का विचारले होते, तेव्हा हो नक्कीच, असे त्याला सांगितले. आयपीएल संपल्यानंतर याबाबतची पुढील चर्चा केली जाईल. तेव्हा माझा फॉर्म व फिटनेस पाहावा लागेल. तसेच संघातील परिस्थितीही पाहावी लागेल. आताचा संघ चांगली कामगिरी करत आहे. त्यात जर मला जागा असेल, तर नक्की मी खेळीन. आयपीएलनंतर बाऊचरसोबतच्या चर्चेची प्रतीक्षा आहे आणि त्यानंतर प्लान आखला जाईल.'' IPL 2021: एक अतरंगी...तर दुसरा सतरंगी...मॅक्सवेल, डीव्हिलियर्सनं KKRला मजबूत धुतलं!

मागच्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्थगित करण्यात आला. तेव्हाही बाऊचर यांनी एबीच्या पुनरागमनाचे स्वागतचं करू असे सांगितले होते.  २०१९च्या वन डे वर्ल्ड कपनंतर एबीनं ४१ ट्वेंटी-२० सामन्यांत ४६.६०च्या सरासरी व १६२.५५च्या स्ट्राईक रेटनं १५ अर्धशतकं झळकावली आहेत. आयपीएल २०२०त त्यानं पाच अर्धशतकांसह १४ डावांत ४५४ धावा चोपल्या. आता आयपीएल २०२१त तीन सामन्यानंतर त्याची धावांची सरासरी ही ६२.५० इतकी आहे. 

टॅग्स :एबी डिव्हिलियर्सद. आफ्रिकाटी-20 क्रिकेटआयसीसी विश्वचषक टी-२०