Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोठी गडबड! पंतप्रधानांच्या खास माणसानेच इम्रान खानऐवजी लावला सचिन तेंडुलकरचा फोटो

या पोस्टवरून हक हे चांगलेच ट्रोल झाले असून क्रिकेट चाहत्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 21:29 IST

Open in App

मुंबई : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे खास सचिव नईम उल हक यांच्याकडून आज फार मोठी चूक घडल्याचे पाहायला मिळाले. या चुकीनंतर हक सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाल्याचे पाहायला मिळाले. कारण हक यांनी इम्रान खान यांच्याऐवजी थेट भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा फोटो पोस्ट केला आहे.

हक यांनी सचिनचा लहानपणीचा फोटो आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. या फोटोखाली त्यांनी इम्रान खान १९६९ असे लिहिले आहे. या पोस्टवरून हक हे चांगलेच ट्रोल झाले असून क्रिकेट चाहत्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.

 

 

 

टॅग्स :सचिन तेंडुलकरइम्रान खान