Join us

पाकिस्तानची मनमानी चालणार नाही, खेळायचं असेल तर भारतात यावंच लागेल! BCCIने दिला दणका

IND vs PAK, BCCI vs PCB : पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हायब्रीड मॉडेलबाबत काही अटी ठेवल्या आहेत. त्यावरून बीसीसीआयने पीसीबीला दणका दिला आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 19:59 IST

Open in App

IND vs PAK, BCCI vs PCB: Champions Trophy 2025 बाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. या स्पर्धेबाबत भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये बराच काळ वाद सुरू होता, मात्र अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही. BCCI ला ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर खेळवायची आहे. तर PCB ने हा फॉर्म्युला स्वीकारण्यासाठी ICC समोर काही अटी ठेवल्या आहेत. यातील एक अट अशी आहे की, भविष्यात पाकिस्तान भारताने आयोजित केलेल्या स्पर्धा हायब्रिड पद्धतीने खेळेल. पण आता या अटीवर एक मोठे अपडेट समोर आले आहे.

'बीसीसीआय'चा पाकिस्तानला मोठा धक्का

अलीकडेच, काही अहवालांनी असा दावा केला आहे की पुढील वर्षीची चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित करण्यावर एकमत झाले आहे, ज्यामुळे भारत दुबईमध्ये आपले सामने खेळेल. त्याचवेळी, हायब्रीड मॉडेलच्या बदल्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीसमोर अटी ठेवल्या होत्या. त्यानुसार २०२७ पर्यंत आयसीसी स्पर्धांमध्ये हायब्रीड मॉडेलचा वापर केला जावा म्हणजे या कालावधीत, भारतात स्पर्धा असल्यास पाकिस्तानचे सामने तटस्थ ठिकाणी व्हावेत अशी अट होती. भारत पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये महिला वनडे विश्वचषक आणि २०२६ मध्ये पुरुषांचा T20 विश्वचषक श्रीलंकेसोबत संयुक्तपणे आयोजित करणार आहे. पण आता अशी बातमी समोर आली आहे की, २०२६ चा टी२० वर्ल्ड कप पूर्णपणे हायब्रिड मॉडेलवर खेळवला जाणार नाही.

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये पाकिस्तान क्रिकेट टीमचे साखळी फेरीचे सामने श्रीलंकेत आयोजित करण्यास तयार आहेत. परंतु सेमीफायनल आणि फायनल मॅचसाठी पाकिस्तानची अट मान्य केली जाणार नाही. म्हणजेच BCCIचे उपांत्य आणि अंतिम सामने भारताबाहेर आयोजित केले जाणार नाहीत. अशा परिस्थितीत पाकिस्तान संघ उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत पोहोचला तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत भारत दौरा करावाच लागेल.

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानबीसीसीआयआयसीसीपाकिस्तान