Mitchell Starc Australia, Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सुरू होण्याआधी ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स, अनुभवी गोलंदाज जोश हेजलवूड हे दोघे चॅम्पियन्स ट्रॉफीतून दुखापतीमुळे बाहेर झाले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला आणखी मोठा धक्का बसला आहे. स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच आपल्या तीनही आघाडीच्या गोलंदाजांशिवाय स्पर्धेत उतरणार आहे. अखेर या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला अंतिम संघ जाहीर केला असून स्टीव्ह स्मिथकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.
ऑस्ट्रेलियन संघाला बुधवारी याबाबतची माहिती मिळाली. स्पर्धेतील वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भाग घेणार नसल्याचे सांगितले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याची पुष्टी केली आहे. कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेडलवूड यांच्या बाहेर पडण्यामुळे ऑस्ट्रेलिया आधीच दबावात होता आणि आता स्टार्कने वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून आपले नाव मागे घेऊन ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढवल्या आहेत. गेल्या आठवड्यात गॉल येथे श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात स्टार्कने फक्त चार षटके टाकली. स्टार्क डाव्या घोट्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळेच त्याने माघार घेतली आहे.
ऑस्ट्रेलियन संघात ५ नवीन खेळाडूंचा समावेश
मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांच्या अनुपस्थितीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाच्या अंतिम १५ सदस्यीय संघात नव्या खेळाडूंना स्थान मिळाले. वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन, नॅथम एलिस, शॉन अॅबॉट आणि बेन द्वारशीस यांना संघात स्थान देण्यात आले. तसेच कपूर कॉनोली हा एक बॅक-अप खेळाडू वाढवण्यात आला. स्पेन्सर जॉन्सनने फक्त दोन एकदिवसीय आणि ८ टी-२० सामने खेळले आहेत. त्याला स्टार्कचा पर्याय म्हणून डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून निवडण्यात आले आहे. एलिस २०२४ च्या टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाचा सदस्य होता आणि त्याला अनुभव आहे. शॉन अॅबॉट पाकिस्तानच्या एकदिवसीय मालिकेचा भाग होता. त्याने २६ वेळा एकदिवसीय सामने खेळले आहेत.
Web Title: Big Blow to Australia Cricket team Mitchell starc pulled out of Champions Trophy after Pat Cummins Josh Hazlewood Steve Smith named captain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.