Join us

'तो' ठरला असता क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट झेल, पण...

ब्रिस्बन हिट संघाने बिग बॅश लीगमध्ये रविवारी मेलबर्न रेनेगॅड्स संघावर 101 धावांची विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 18:20 IST

Open in App

सिडनी : ब्रिस्बन हिट संघाने बिग बॅश लीगमध्ये रविवारी मेलबर्न रेनेगॅड्स संघावर 101 धावांची विजय मिळवला. हिट संघाचा हा सलग तिसरा विजय ठरला. मॅक्स ब्रायंटने 24 चेंडूंत 44 धावांची खेळी केली. ब्रेंडन मॅकलम आणि कर्णधार ख्रिस लीन यांनी अनुक्रमे 69 व नाबाद 66 धावांची खेळी करताला ब्रिस्बन संघाला 4 बाद 192 धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात मेलबर्न संघाचा डाव 17.5 षटकांत 91 धावांवर गडगडला.

मात्र, निकालापेक्षा या सामन्यातील एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. 15 व्या षटकात कॅमेरून बोयसेच्या चेंडूवर लिनने जोरदार फटका मारला. तो चेंडू समोरील साईट स्क्रीनच्या दिशेने गेला आणि शेजारील स्टॅण्डवर बसलेला एक प्रेक्षक तो चेंडू टिपण्यासाठी धावला. त्याने तो कॅच टिपला असता तर तो क्रिकेट इतिहासातिल सर्वोत्कृष्ट झेल ठरला असता. पण, त्या चाहत्याला अपयश आले.पाहा व्हिडीओ... 

टॅग्स :आॅस्ट्रेलिया