Join us  

Bhuvneshwar Kumar : भुवनेश्वर कुमारलाच आता कसोटी क्रिकेट खेळायचे नाही, समोर आलं मोठं कारण!

हार्दिक पांड्या, पृथ्वी शॉ आणि भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar) यांना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनल व इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठीच्या संघात स्थान मिळाले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 12:23 PM

Open in App
ठळक मुद्देइंग्लंड दौऱ्यासाठी 20 सदस्यीय संघाची घोषणा, जडेजा, विहारी यांचे पुनरागमनभुवनेश्वर कुमार, पृथ्वी शॉ व हार्दिक पांड्या यांचा समावेश नाही

भारतीय क्रिकेट नियामक मंडाळानं ( BCCI) नुकतंच इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. हार्दिक पांड्या, पृथ्वी शॉ आणि भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar) यांना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनल व इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठीच्या संघात स्थान मिळाले नाही. हार्दिक गोलंदाजी करत नसल्यानं त्याची निवड न होणे अपेक्षित समजले जात होते, त्यात पृथ्वी शॉला टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी वजन कमी करण्यास सांगितल्याचे वृत्त समोर आले होते. पण, एकेकाळी संघातील प्रमुख गोलंदाज असलेल्या भुवनेश्वरला का वगळले, याचे उत्तर मिळाले नव्हते. भुवीलाच आता कसोटी क्रिकेट खेळायचे नसल्याचे वृत्त समोर येत आहे. Times of India ने दिलेल्या वृत्तानुसार भुवीनंच कसोटी क्रिकेट न खेळण्याची इच्छा व्यक्त केल्याचे त्यांना सूत्रांनी सांगितले. "Miss You Papa"!; ईदच्या दिवशी मोहम्मद सिराजच्या डोळ्यांत अश्रू, वडिलांच्या आठवणीत झाला भावुक 

''भुवनेश्वर कुमारलाचा आता कसोटी क्रिकेट खेळायचे नाही. त्यामुळेच त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी निवडले गेले नाही,''असे सूत्रांनी TOI ला सांगितले. ते पुढे म्हणाले,''जे त्याला जवळून ओळखतात त्यांना हे माहित असेलच की त्यांनं त्याच्या गोलंदाजीत बरेच बदल केले आहेत. त्यानं संपूर्ण लक्ष्य मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर केंद्रीत केले आहे. त्यामुळे निवड समितीही त्याचा कसोटीसाठी विचार करत नाही. भुवीतही 10 षटकांपलीकडची भूक जाणवत नाही. हा भारतीय संघाचा तोटा आहे.'' 

भुवीपण कसोटी क्रिकेटचा विचार करत नाही. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा खेळण्याचे लक्ष्य त्याच्यासमोर आहे. भुवीनं 21 कसोटींत 63 विकेट्स घेतल्या आहेत. 82 धावांत 6 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. कसोटीत त्याच्या नावावर 552 धावांसह 3 अर्धशतकं आहेत. 117 वन डे व 48 ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं अनुक्रमे 138 व 45 विकेट्स घेतल्या आहेत.  एक्स्ट्रा उंगली हृतिक के पास है, पर करता मायकल वॉन है!; वासिम जाफरनं इंग्लंडच्या माजी कर्णधाराला सुनावलं

हनुमा विहारी, रवींद्र जडेजा व मोहम्मद शमी यांचे टी इंडियात पुनरागमन झाले आहे. हार्दिक व पृथ्वी यांच्यासह भुवनेश्वर कुमार व कुलदीप यादव यांचीही निवड झालेली नाही. लोकेश राहुल व वृद्धीमान सहा यांची निवड फिटनेस टेस्टनंतर आणि राखीव खेळाडू म्हणून अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला यांची निवड झालेली आहे. Great work Pakistan!; पाकिस्तान संघानं झिम्बाब्वेला लोळवलं अन् शाहिद आफ्रिदीनं उधळली स्तुतीसुमनं!

भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव विराट अँड कंपनीसह टीम इंडियाचे आणखी दोन संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार; BCCI नं केली खेळाडूंच्या नावाची घोषणा!

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा - १८ ते २३ जून - भारत विरुद्ध न्यूझीलंड ( जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल); भारत वि. इंग्लंड कसोटी मालिका - ४ ते ८ ऑगस्ट - पहिली कसोटी, १२ ते १६ ऑगस्ट - दुसरी कसोटी, २५ ते २९ ऑगस्ट - तिसरी कसोटी, २ ते ६ सप्टेंबर - चौथी कसोटी, १० ते १४ सप्टेंबर - पाचवी कसोटी 

टॅग्स :भुवनेश्वर कुमारभारत विरुद्ध इंग्लंडजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा