विराट अँड कंपनीसह टीम इंडियाचे आणखी दोन संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार; BCCI नं केली खेळाडूंच्या नावाची घोषणा!

भारतीय संघ पुढील महिन्यापासून इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ १८ ते २३ जून या कालावधीत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा सामना करेल, त्यानंतर इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका. चार महिन्यांच्या या दौऱ्यासाठी बीसीसीआयनं नुकतीच टीम इंडियाची घोषणा केली. या संघासोबत आणखी दोन संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत आणि बीसीसीआयनं शुक्रवारी रात्री संघाची घोषणा केली.

कोरोना परिस्थितीत इंग्लंडमध्ये सराव सामन्यांचे आयोजन होणं, अवघड आहे. त्यामुळे जम्बो संघ पाठवून त्यातून दोन संघ तयार करून टीम इंडियाला सराव सामनेही खेळता येतील. हार्दिक पांड्या गोलंदाजीसाठी अजूनही तंदुरूस्त नसल्यानं कसोटी संघात त्याची निवड झालेली नाही. पण, पृथ्वी शॉला डावलल्यानं सर्वांना आश्चर्य वाटले.

हनुमा विहारी, रवींद्र जडेजा व मोहम्मद शमी यांचे टी इंडियात पुनरागमन झाले आहे. हार्दिक व पृथ्वी यांच्यासह भुवनेश्वर कुमार व कुलदीप यादव यांचीही निवड झालेली नाही. लोकेश राहुल व वृद्धीमान सहा यांची निवड फिटनेस टेस्टनंतर आणि राखीव खेळाडू म्हणून अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला यांची निवड झालेली आहे.

भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा - १८ ते २३ जून - भारत विरुद्ध न्यूझीलंड ( जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल); भारत वि. इंग्लंड कसोटी मालिका - ४ ते ८ ऑगस्ट - पहिली कसोटी, १२ ते १६ ऑगस्ट - दुसरी कसोटी, २५ ते २९ ऑगस्ट - तिसरी कसोटी, २ ते ६ सप्टेंबर - चौथी कसोटी, १० ते १४ सप्टेंबर - पाचवी कसोटी

भारताच्या पुरूष संघासोबत महिला क्रिकेट संघही याच काळात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी कसोटी व वन डे - ट्वेंटी-20 संघांची घोषणा बीसीसीआयनं केली. 17 वर्षीय शेफाली वर्मा ( Shafali Verma) हिचे वन डे संघात पदार्पण झाले आहे. बीसीसीआयनं प्रत्येकी 18 सदस्यांचे दोन संघ जाहीर केले आहेत.

इंग्लंड दौऱ्यावर भारतीय महिला संघ एक कसोटी, तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. कसोटी व वन डे संघाचे नेतृत्व मिताली राजकडे ( Mithali Raj) असेल, तर ट्वेंटी-20 संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे असेल (Harmanpreet Kaur).

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून वगळण्यात आलेल्या शिखा पांडे व तानिया भाटीया यांचे पुनरागमन झाले आहे. यष्टिरक्षक इंद्रानी रॉय हिला पदार्पणाची संधी मिळाली आहे. लेफ्ट आर्म फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड अजूनही कोरोनातून बरी झालेली नाही, त्यामुळे तिची निवड झालेली नाही.

महिला संघाच्या दौऱ्याचे वेळापत्रक - कसोटी ( 16 ते 19 जून, ब्रिस्टॉल), वन डे - ( 27, 30 जून व 3 जुलै), ट्वेंटी-20 - ( 9, 11 व 15 जुलै). ( The All-India Senior Women's Selection Committee on Friday announced the Indian squad for the one-off Test match, ODI & T20I series against England)

कसोटी व वन डे संघ - मिताली राज ( कर्णधार), स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, पूनम राऊत, प्रिया पुनिया, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रीग्स, शेफाली वर्मा, स्नेह राणा, तानिया भाटिया ( यष्टिरक्षक), इंद्राणी रॉय ( यष्टिरक्षक), झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिस्त, राधा यादव. ( India’s Senior Women squad for Test & ODI : Mithali Raj (Captain), Smriti Mandhana, Harmanpreet Kaur (vice-captain), Punam Raut, Priya Punia, Deepti Sharma, Jemimah Rodrigues, Shafali Verma, Sneh Rana, Taniya Bhatia (wicket-keeper), Indrani Roy (wicket-keeper), Jhulan Goswami, Shikha Pandey, Pooja Vastrakar, Arundhati Reddy, Poonam Yadav, Ekta Bisht, Radha Yadav.)

ट्वेंटी-20 संघ - हरमनप्रीत कौर ( कर्णधार), स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रीग्स, शेफाली वर्मा, रिचा घोष, हर्लीन देओल, स्नेह राणा, तानिया भाटीया, इंद्राणी रॉय, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिस्त, राधा यादव, सिमरन दिल बहादूर. ( India’s Senior Women squad for T20I : Harmanpreet Kaur (Captain) Smriti Mandhana (vice-captain), Deepti Sharma, Jemimah Rodrigues, Shafali Verma, Richa Ghosh, Harleen Deol, Sneh Rana, Taniya Bhatia (wicket-keeper), Indrani Roy (wicket-keeper), Shikha Pandey, Pooja Vastrakar, Arundhati Reddy, Poonam Yadav, Ekta Bisht, Radha Yadav, Simaran Dil Bahadur.)