भुवनेश्वर-बुमराह विंडीजच्या हेटमेयर-होपला रोखतील

गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे विशाखापट्टणममध्ये दुसरा एकदिवसीय सामना टाय झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 03:33 AM2018-10-27T03:33:21+5:302018-10-27T03:33:40+5:30

whatsapp join usJoin us
Bhuvneshwar-Bumrah will stop the hammer-hop from the West Indies | भुवनेश्वर-बुमराह विंडीजच्या हेटमेयर-होपला रोखतील

भुवनेश्वर-बुमराह विंडीजच्या हेटमेयर-होपला रोखतील

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- सुनील गावसकर लिहितात...
गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे विशाखापट्टणममध्ये दुसरा एकदिवसीय सामना टाय झाला. उभय संघांच्या कर्णधारांसाठी गोलंदाजांचे अपयश चिंतेचा विषय ठरत आहे. टी२० च्या प्रभावामुळे एकदिवसीय क्रिकेटमध्येही खोऱ्याने धावा फटकावल्या जात आहेत. एकेकाळी ३०० चा स्कोअर एखाद्याच लढतीत बघायला मिळत होता, पण आता मात्र ही सामान्य बाब झाली आहे. यजमान असल्यामुळे भारताला संघात बदल करण्याची संधी आहे, तर पाहुण्या संघाला मात्र १६ खेळाडूंमधूनच संघाची निवड करावी लागते. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाने भुवनेश्वर कुमार व जसप्रीत बुमराह यांना उर्वरित तीन एकदिवसीय सामन्यांसाठी संघात स्थान दिले आहे. हे दोन्ही गोलंदाज कॅरेबियन फलंदाजांविरुद्ध विशेषत: सलामीवीरांविरुद्ध कशी कामगिरी करतात, याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, तीन आठवड्यांनंतर पुनरागमन करताना लय मिळवणे सोपी बाब नसते. काही दिवसांपूर्वीच बांगलादेशचा क्रिकेटपटू तमीम इक्बालने भारतीय कर्णधाराची प्रशंसा करताना कोहली विशेष असल्याचे म्हटले होते. रन मशीन विराट कोहलीचे फलंदाजीतील सातत्य बघितल्यानंतर त्याचे हे वक्तव्य अचूक असल्याची प्रचिती येते.
कोहलीचे फलंदाजीतील सातत्य शानदार आहे, पण त्यापेक्षाही विशेष म्हणजे मोक्याच्या क्षणी आणि संघाची गरज ओळखून फलंदाजी करण्याची त्याची क्षमता आहे. कोहली ज्यावेळी फलंदाजीसाठी मैदानात उतरतो त्यावेळी शतकाबाबत चर्चा सुरू होते. अशा प्रकारची चर्चा यापूर्वी केवळ सर डॉन ब्रॅडमन फलंदाजीला जात असताना होत होती. दरम्यान, ब्रॅडमन फलंदाजीला जाताना आनंदी चेहºयाने खेळपट्टीवर दाखल होत होते तर विराटच्या चालीमध्ये बेदरकार वृत्ती असते. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांमध्ये त्याच्याकडे बघण्याचे साहस नसते.
वेस्ट इंडिज संघाला ३०० पेक्षा अधिक धावसंख्या नोंदवण्यापासून रोखण्यासाठी भारताला आपल्या गोलंदाजीमध्ये महत्त्वाचे बदल करावा लागेल. त्यासाठी संघाला क्षेत्ररक्षणामध्येही सुधारणा करणे गरजेचे आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाला गरज नसताना करण्यात येणाºया थ्रोबाबत (धावबादची शक्यता नसताना) विचार करावा लागेल. विशाखापट्टणममधील झालेल्या अनिर्णित लढतीत ही बाब प्रकर्षाने जाणवली. (पीएमजी)

Web Title: Bhuvneshwar-Bumrah will stop the hammer-hop from the West Indies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.