Join us
Daily Top 2Weekly Top 5

भुवनेश्वरने मारली बाजी

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरूध्द कसोटी मालिका जरी गमावली असली तरी जोहान्सबर्गमध्ये टीम इंडियाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अंतिम कसोटीमध्ये कर्णधार विराट कोहलीसह चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांची फलंदाजी आणि भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीमुळे भारतीय संघाने विजय नोंदविला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 01:59 IST

Open in App

- अयाझ मेमनसंपादकीय सल्लागारभारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरूध्द कसोटी मालिका जरी गमावली असली तरी जोहान्सबर्गमध्ये टीम इंडियाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अंतिम कसोटीमध्ये कर्णधार विराट कोहलीसह चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांची फलंदाजी आणि भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीमुळे भारतीय संघाने विजय नोंदविला. या सामन्यात नाही तरी पूर्ण मालिकेत भारतीय गोलंदाजी भेदक गोलंदाजी केली. कसोटी मालिका भारतीय संघापुढे आव्हान होते. या मालिकेतील प्रत्येक खेळाडूचे विश्लेषण लोकमत वाचकांसाठी केले आहेक्रिकेट समिक्षक अयाज मेमन यांनी...नंबर 1भुवनेश्वर कुमारगोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही क्षेत्रात उत्कृष्ट ठरला. वेगाला स्विंगच्या जाडीमुळे चेंडू अधिक घातक ठरत होता. दुसºया सामन्यात संयम आणि दृढ विश्वासाने फलंदाजी केली.नंबर 2विराट कोहलीजबरदस्त फलंदाजी. ज्या खेळपट्टीवर ए.बी. डिव्हिलियर्स व हाशिम आमला संघर्ष करत होते तिथे विराट आत्मविश्वासाने खेळला. संघनिवडीचा काही भाग सोडला तर आक्रमक नेतृत्व व अधिकाराने संघ एकजूट करीत तिसºया सामन्यात विजय मिळवून दिला.जसप्रीत बुमराहपहिल्या मालिकेत १४ बळी म्हणजे संस्मरणीय. मोठ्या पातळीवर मात्र निराश केले. तो शिघ्र प्रशिक्षणार्थी असल्याचे दिसले. आपल्या अजब तांत्रिक कौशल्याने फलंदाजांना संकटात टाकले. जबरदस्त शोध.नंबर 3मोहम्मद शमीमालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज. चांगली गोलंदाजी केली खासकरून अखेरच्या सामन्यात. दक्षिण आफ्रिकेची तळातील फलंदाजी नेस्तनाबूत केली. सातत्य राखले तर जगातील सर्वाेत्तम गोलंदाजाची क्षमता.नंबर 4ईशांत शर्मावेगवान व तितकीच योग्य गोलंदाजी फलंदाजांना दबावात आणते. फुकट धावा देणे महागडे ठरते.नंबर 5आर. आश्विनखेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल नाही, असा विचार असतानाही त्याने दोन कसोटी सामन्यांत चांगले प्रदर्शन केले. चिवट फलंदाजीसुद्धा प्रभावी ठरली.नंबर 6अजिंक्य रहाणेपहिल्या दोन्ही सामन्यांत त्याच्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्याने ही चूक दाखवून दिली. अखेरच्या डावात त्याने केलेली ४८ धावांची खेळी मॅच विनिंग ठरली. त्यामुळे पुढील सामन्यासाठी त्याने आपली जागा कायम ठेवली आहे.वृद्धिमन साहापहिल्या कसोटी सामन्यात यष्टिमागे उत्तम कामगिरी. उर्वरित सामन्यांत मात्र संधी घालवल्या. त्यामुळे संघाला नुकसानही सहन करावे लागले.नंबर 7मुरली विजयखेळपट्टीवर नवा चेंडू आणि गोलंदाजांविरुद्ध खेळण्यास अपयशी. सलामीवीर म्हणून पूर्णपणे अपयशी. तिसºया सामन्यात थोडीशी चांगली फलंदाजी.हार्दिक पांड्यामालिकेतील पहिल्या डावात ९३ धावांची खेळी केल्यानंतर आश्वस्त केले होते. मात्र, सातत्य नसणे आणि बेजाबदारपणामुळे नाराज केले. साहाय्यक गोलंदाज रूपात ठिक होता.नंबर 8पार्थिव पटेलसाहा दुखापतग्रस्त झाल्यानंतर पार्थिवला संधी मिळाली. ही त्याच्यासाठी जीवनरेखा ठरली. मात्र, यष्टीमागे चुका आणि त्रुटी दिसल्या. त्यामुळे तो प्रभाव टाकू शकला नाही.नंबर 9चेतेश्वर पुजारादुसºया कसोटी सामन्यात दोन्ही डावांत धावबाद झाला. तिसºया सामन्यात मात्र अत्यंत महत्त्वाचे असे अर्धशतकीय योगदान दिले. त्यामुळे काही चुका झाकल्या गेल्या.नंबर 10रोहित शर्माप्रतिभासंपन्न खेळाडू. पण पाच दिवसांच्या सामन्यात त्याने आपली क्षमता दाखवली नाही. आपल्या डावाची सुरुवात करून मोठी धावसंख्या उभारण्यासाठी व आपले स्थान कायम राखण्याची संधी होती.नंबर 11के.एल. राहुलपहिल्या अकरांत स्थान मिळवून स्वत:ला सिद्ध केले नाही. त्याच्या चुका संघासाठी महागड्या ठरल्या. खासकरून दुसºया सामन्यात. त्याची क्षमता आणि शिस्त यानुसार तो साजेशा खेळला नाही.शिखर धवनपहिल्या कसोटी सामन्यात दोनदा शॉर्ट पिच चेंडूवर बाद झाला. घरच्या तुलनेत विदेशी खेळपट्टीवर शिखरची फलंदाजी अत्यंत वेगळी दिसून आली. त्यामुळे त्याच्या स्थानाबाबत आता साशंकता आहे.--- रवींद्र जडेजा या मालिकेतील एकही कसोटी सामना खेळला नाही. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८विराट कोहली