Sachin Tendulkar Meet Deputy CM Eknath Shinde: 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा विवाह मार्च महिन्यात प्रसिद्ध उद्योगपती घई यांची नात सानिया चांडोक हिच्याशी होणार आहे. सचिनने या विवाहसोहळ्याचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत अनेक बड्या नेत्यांना दिले. त्याबाबत सोशल मीडियावरही पोस्ट केली. यानंतर आता सचिन तेंडुलकर याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
भारतरत्न सचिन तेंडुलकर याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी येऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांची पत्नी अंजली तेंडुलकर याही उपस्थित होत्या. सचिन यांचे ज्येष्ठ सुपुत्र अर्जुन यांच्या विवाहाची पत्रिका देण्यासाठी त्यांनी ही भेट घेतली.
सचिन तेंडुलकर आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे आणि सचिन यांच्यात अनेक विषयावर चर्चा झाली. यात प्रामुख्याने राज्यातील क्रीडा सुविधांबाबत चर्चा केली. शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती घेऊन त्याबद्दल समाधान व्यक्त केले.
दरम्यान, सचिनने पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो पोस्ट करत लिहिले की, अर्जुन आणि सानियाच्या विवाहासाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रित करण्याचे सौभाग्य लाभले. तुमचा आशीर्वाद आणि मोलाचा सल्ला मिळाला, त्याबद्दल आभार. सचिनने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही लग्नाचे निमंत्रण दिले. त्याबद्दल त्याने लिहिले की, अमित शाह यांना लग्नासाठी निमंत्रित केले. त्यांनी आमचा यथोचित पाहुणचार केला. त्यांचे मनापासून आभार.
Web Summary : Sachin Tendulkar, along with his wife Anjali, met Deputy CM Eknath Shinde at his residence to invite him to his son Arjun's wedding. They discussed sports facilities in Maharashtra. Sachin also invited PM Modi and Amit Shah.
Web Summary : सचिन तेंदुलकर, पत्नी अंजलि के साथ, बेटे अर्जुन की शादी का निमंत्रण देने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे से उनके आवास पर मिले। उन्होंने महाराष्ट्र में खेल सुविधाओं पर चर्चा की। सचिन ने पीएम मोदी और अमित शाह को भी आमंत्रित किया।