Join us

भाई, उर्वशी बुला रही है! रिषभ पंतला प्रेक्षकांनी डिवचले, भारतीय खेळाडू चिडला अन्... Video 

रिषभ पंत व बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela) यांच्या अफेअर्सच्या बऱ्याच चर्चा मध्यंतरी रंगल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 11:53 IST

Open in App

भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत ( Rishabh Pant) याला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत एकाच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली, परंतु झिम्बाब्वेविरुद्ध त्याला अपयश आले. रिषभला उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध मैदानावर उतरवावे, अशी अनेकांची इच्छा आहे. पण, सध्या तरी रिषभ पंत १२ व्या खेळाडूच्या भूमिकेत दिसतोय आणि खेळाडूंसाठी पाणी घेऊन जाण्याचं काम तो करतोय. मात्र त्याच्यासोबत प्रेक्षक चुकीचं वागत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यावेळेस भारतीय यष्टीरक्षकाला त्याच्या रागावर संयम ठेवता आला नाही आणि त्याने खडेबोल सूनावले. 

Rohit Sharmaच्या हातावर चेंडू आदळला, सुरू झाली पळापळ! समोर आले अपडेट्स, पाहा Video 

रिषभ पंत व बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela) यांच्या अफेअर्सच्या बऱ्याच चर्चा मध्यंतरी रंगल्या. आशिया चषक स्पर्धेपूर्वी उर्वशीने दिलेल्या एका मुलाखतीवरून नवा वादही निर्माण झाला आणि त्याला रिषभने सडेतोड उत्तर दिले. त्यानंतर उर्वशीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून माफी मागितली. पण, भारताची मॅच पाहण्यासाठी ती मैदानावर दिसल्याने रिषभला अनेकांनी ट्रोल केले. रिषभ दिसताच काही टवाळ प्रेक्षक उर्वशीच्या नावाने त्याला चिडवताना दिसले. 

वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी उर्वशीने आपणही ऑस्ट्रेलियात जात असल्याची पोस्ट केली आणि त्यावरून ती ट्रोल झाली. ती मायदेशात परतली असली तरी रिषभला टवाळ प्रेक्षकांचा सामना करावा लागत आहे. भारताच्या सामन्यावेळी सीमारेषेवर असलेल्या रिषभला काही प्रेक्षक उर्वशीच्या नावाने चिडवत असल्याचा व्हिडीओ समोर आला. त्यात प्रेक्षक त्याला, भाई उर्वशी बुला रही है असे म्हणताना ऐकू येत आहे. चिडलेल्या रिषभनेही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन गप्प केले... 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"     

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ऑफ द फिल्डरिषभ पंतउर्वशी रौतेला
Open in App