मुंबई : भारतीय महिला क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू म्हणून मिताली राजला ओळखले जाते. महिला क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्यात मितालीचा मोलाचा वाटा आहे. या गुणी खेळाडूने गुरुवारी आपला ३८ वा वाढदिवस साजरा केला. महिला क्रिकेटमध्ये विक्रमांचे इमले रचणारी मिताली अजूनही अविवाहीत आहे. याबाबत विचारले असता ती म्हणाली, “मी खूप लहान असताना माझ्या मनात लग्नाचा विचार आला होता. पण विवाहित लोकांना बघितल्यावर माझा लग्नावरचा विश्वास उडाला. अविवाहित राहणेच चांगले असते या मताची मी आहे.” १९९९ साली तिने आंतराष्ट्रीय क्रिकटेमध्ये पदार्पण केले होते.