Join us

Ben Stokes Retirement Video: शेवटची वन-डे खेळायला उतरला बेन स्टोक्स, मैदानात येताच डोळ्यांत तरळले अश्रू

स्टोक्सने काल तडकाफडकी केली वन-डे तून निवृत्तीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 19:34 IST

Open in App

Ben Stokes Retirement Emotional Video: इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेस्टर ली स्ट्रीटवर खेळवला जात आहे. आपल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत शेवटचा सामना खेळण्यासाठी आज इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स मैदानात उतरला. स्टोक्सने सोमवारी (काल) वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आजचा सामना हा त्याचा शेवटचा वन डे सामना असल्याने तो त्याच्यासाठी खास आहे. या सामन्यासाठी मैदानात उतरताना बेन स्टोक्सच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचे दिसून आले. 

दक्षिण आफ्रिके विरूद्ध इंग्लंडचे नेतृत्व करण्यासाठी बेन स्टोक्स मैदानात उतरला. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत जेव्हा इंग्लंडचा संघ मैदानावर उतरणार होता, तेव्हाचे वातावरण अतिशय भावूक होते. मैदानावर पाऊल ठेवताना बेन स्टोक्सला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्याचे डोळे भरून आले. इंग्लंड क्रिकेटने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. पाहा व्हिडीओ-

दरम्यान बेन स्टोक्सने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल, तरी तो टी२० आणि कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व करत राहणार आहे. बेन स्टोक्सची नुकतीच इंग्लंड कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. बेन स्टोक्स पूर्णवेळ कर्णधार असताना ब्रँडन मॅकलमच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने न्यूझीलंडचा ३-० असा पराभव केला. यानंतर एजबॅस्टन कसोटीत स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लिश संघाने भारतालाही धूळ चारली.

टॅग्स :बेन स्टोक्सइंग्लंडद. आफ्रिकासोशल मीडिया
Open in App