Join us

कोण आहे हा गोलंदाज? टी-२० सामन्यात ८ धावांत ६ विकेट्स! हॅटट्रिकचा डाव साधला, पण वर्ल्ड रेकॉर्ड हुकला

टी-२० त बेस्ट बॉलिंग फिगरच्या टॉप ५ मध्ये आहे दीपक चाहरचही नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:35 IST

Open in App

Vitality Blast Men 2025 : इंग्लंडमध्ये एका बाजूला भारतीय संघाच्या दौऱ्याची चर्चा सुरु असताना दुसऱ्या बाजूला  व्हिटॅलिटी ब्लास्टमध्ये कमालीची गोलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजाने क्रिकेट जगताचे लक्षवेधून घेणारी कामगिरी करुन दाखवलीये. नॉर्थम्पटनशायरच्या ताफ्यातील जलदगती गोलंदाज बेन सँडरसन याने हॅटट्रिकचा डाव साधत एका षटकात ४ विकेट्स घेतल्या. एवढेच नाही तर चार षटकांच्या आपल्या स्पेलमध्ये त्याने ८ धावा खर्च करत ६ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

आपल्या कोट्यातील अखेरच्या षटकात साधला हॅटट्रिकचा डाव 

नॉर्थम्पटनशायरकडून १९ व्या षटकात बेन सँडरसन याने  पहल्याच चेंडूवर टॉम हीनली याला तंबूचा रस्ता दाखवला. दुसऱ्या चेंडूवर एक धाव दिल्यावर तिसरा चेंडू त्याने निर्धाव टाकला. त्यानंतर उर्वरित प्रत्येक चेंडूवर विकेट घेत त्याने हॅटट्रिकचा डाव साधला. याआधी २ षटकात त्याने २ बळी टिपले होते. 

Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!

त्याच्या भेदक माऱ्याच्या जोरावर संघानं जिंकला सामना

बेन सँडरसनच्या भेदक माऱ्याच्या जोरावर व्हिटॅलिटी ब्लास्ट टी-२० स्पर्धेतील या सामन्यात नॉर्थम्पटनशायर संघाने वॉरसेस्टरशायरला पराभूत केले. नॉर्थम्पटनशायर संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १९० धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना वॉरसेस्टरशायर संघ १५९ धावांत आटोपला. बेन सँडरसनच्या माऱ्यासमोर एकालाही तग धरता आला नाही.

टी-२० त सर्वाधिक विकेट्स घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड कुणाच्या नावे?

टी-२० क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम हा मलेशियाचा मध्यम जलगती गोलंदाज स्याझ्रुल इद्रुस (Syazrul Idrus) याच्या नावे आहे. त्याने २०२३ मध्ये चीन विरुद्धच्या सामन्यात ८ धावा खर्च करून ७ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात त्याने ही कामगिरी नोंदवली होती. आंतरारष्ट्रीय टी २० सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भारताचा दीपक चाहर हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २०१९ मध्ये बागंलादेश विरुद्धच्या सामन्यात ३.२ षटकात ७ धावा खर्च करत ६ विकेट्स घेतल्या होत्या.  

टॅग्स :टी-20 क्रिकेटव्हायरल व्हिडिओइंग्लंड