Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान सुपर लीगमध्ये भयानक घटना, खेळाडूच्या तोंडावर आदळला चेंडू, ७ टाके अन् सर्जरी!

ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज बेन डंक (Ben Dunk) गंभीररित्या जायबंदी झाला आहे. पाकिस्तान सुपर लीगच्याआधी सराव शिबिरात बेन डंक याच्या तोंडावर चेंडू आदळल्यानं तो गंभीर जखमी झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 14:40 IST

Open in App

ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज बेन डंक (Ben Dunk) गंभीररित्या जायबंदी झाला आहे. पाकिस्तान सुपर लीगच्याआधी सराव शिबिरात बेन डंक याच्या तोंडावर चेंडू आदळल्यानं तो गंभीर जखमी झाला आहे. बेनच्या तोंडावर ७ टाके घालण्यात आले आहेत. पाकिस्तान सुपर लीगमध्ये बेन डंग लाहौर कलंदर्स संघाकडून खेळतो. 

अबू धाबी येथे सराव करत असताना बेनच्या तोंडावर चेंडू आदळला. यात जखमी झाल्यानं त्याला आता पुढील काही आठवडे क्रिकेटपासून दूर राहावं लागणार आहे. ३४ वर्षीय बेन डंग याला झालेली दुखापत इतकी गंभीर होती की तातडीनं सर्जरी देखील करावी लागली. पाकिस्तान सुपर लीगला ९ जूनपासून सुरूवात होणार आहे. स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच लाहोर कलंदर्स संघाला मोठा धक्का बसला आहे. 

लाहोरचा संघ सध्या गुणतालिकेत चा सामन्यांपैकी तीन सामने जिंकून तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तान सुपर लीगला मार्च महिन्यातच सुरुवात झाली होती. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा थांबविण्यात आली होती. आता स्पर्धेचे उर्वरित सामने यूएईमध्ये होणार आहेत. 

बेन डंग लाहोरच्या संघातील प्रमुख शिलेदार आहे. यंदाच्या पर्वात त्यां ४० च्या सरासरीनं ८० धावा केल्या आहेत. यात कराची किंग्ज विरुद्ध त्यानं नाबाद ५७ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली होती.  

टॅग्स :पाकिस्तानआॅस्ट्रेलिया