लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, IPL 2024 बाबत मोठा निर्णय; जय शाह म्हणाले...

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चा हंगाम नेमका कुठे व कसा खेळवला जाईल, याची उत्सुकता लागली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 11:24 AM2024-03-17T11:24:58+5:302024-03-17T11:25:18+5:30

whatsapp join usJoin us
BCCI secretary Jay Shah confirms that IPL 2024 not going overseas | लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, IPL 2024 बाबत मोठा निर्णय; जय शाह म्हणाले...

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, IPL 2024 बाबत मोठा निर्णय; जय शाह म्हणाले...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी १८ व्या लोकसभा निवडणुकांची घोषणा केली.  ही निवडणूक ७ टप्प्यात होत असून २८ मार्च रोजी पहिलं नोटीफिकेश जारी होणार आहे. तर, १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होईल. महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानुसार, १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर, देशातील संपूर्ण लोकसभा निवडणुकांचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल. आता या तारखा जाहीर झाल्यानंतर इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चा हंगाम नेमका कुठे व कसा खेळवला जाईल, याची उत्सुकता लागली आहे.


दोन दिवसांपूर्वी काही इंग्रंजी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार कदाचित आयपीएल २०२४ चा दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिराती येथे खेळवला जाऊ शकतो. यासाठी बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी यूएईला दाखल झाले असल्याचेही वृत्त समोर आले होते. कोरोना काळात आणि यापूर्वीही आयपीएल दुबईत खेळवली गेली आहे. त्यामुळे हा पर्याय होऊ शकतो असे सांगण्यात आले. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम पाहता भारतात संपूर्ण आयपीएल २०२४ खेळवणे अवघडच वाटत आहे. त्यात बीसीसीआय सचिव जय शाह ( Jay Shah) यांनी मोठे अपडेट्स दिले आहेत.


 इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) परदेशात होणार नाही याची पुष्टी BCCI ने केली आहे. भारतातील सार्वत्रिक निवडणुकांमुळे संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता वर्तवल्यानंतर बीसीसीआयकडून हे स्पष्टिकरण आले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी क्रिकबझला सांगितले की, संपूर्ण लीग भारतात आयोजित केली जाईल आणि ती परदेशात हलवण्याचा कोणताही विचार नाही. 

श्रेयस अय्यर कोलका नाइट रायडर्सच्या ताफ्यात दाखल
श्रेयस अय्यर शनिवारी कोलकाता नाट रायडर्समध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत सामील होण्यासाठी कोलकाता येथे रवाना झाला. मुंबईत नुकत्याच संपलेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम दोन दिवसांत पाठदुखीमुळे तो मैदानावर आला नव्हता, त्यामुळे त्याच्या आयपीएल खेळण्यावर साशंकता व्यक्त केली गेली होती. त्याच्या स्कॅनमध्ये कोणतीही महत्त्वपूर्ण समस्या दिसून आली नाही, ज्यामुळे त्याला सुरुवातीपासूनच आयपीएलमध्ये सहभागी होण्यास मंजुरी मिळाली आहे.  

Web Title: BCCI secretary Jay Shah confirms that IPL 2024 not going overseas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.