Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर

आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाच्या जर्सीवरून ड्रीम ११ नाव गायब होणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 15:07 IST2025-08-22T14:42:54+5:302025-08-22T15:07:14+5:30

whatsapp join usJoin us
BCCI secretary Devajit Saikia Dream 11 still Team India’s sponsor Or Not | Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर

Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Dream 11 still Team India’s Sponsor After Shut Down ? : ऑनलाइन गेमिंग विधेयक (Online Gaming Bill 2025) लोकसभेसह राज्यसभेत मंजूर झाल्यावर ड्रीम ११ कंपनीनं (Dream 11) गाशा गुंडाळायला सुरुवात केलीये. २०१३ पासून ड्रीम ११ ) टीम इंडियाचा मुख्य प्रायोजक आहे. (BCCI) सोबत या कंपनीनं तीन वर्षांसाठी ३५८ कोटी रुपायांचा करार केला होता. त्यामुळेच भारतीय पुरुष, महिला आणि अंडर-१९ संघाच्या जर्सीवर ड्रीम ११ हे नाव लिहिले जायचं.

पण आता ऑनलाइन गेमिंग विधेयकामुळे ड्रीम ११ चा खेळ खल्लास झालाय. त्यामुळे बीसीसीआयसोबत असणारा त्यांचा करार मोडीत निघण्याची शक्यता निर्माण झालीये. आशिया कप स्पर्धेत भारतीय संघ स्पॉन्सरशिवाय मैदानात उतरणार का? असा प्रश्नही निर्माण झालाय. इथं जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सिविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

विधेयकाला बीसीसाआयचाही पाठिंबा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा, २०२५ आणि ऑनलाइन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक, २०२५ या दोन्ही विधेयकांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. BCCI चे सचिव देवजित सैकिया यांनी  या दोन्ही विधयाकातील तरतूदीचे काटेकोरपणे पालन केले जाईल, असे म्हटले आहे.

२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?

करारासंदर्भात बीसीसीआय सचिवांनी स्पष्ट केली भूमिका

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना, त्यांनी ड्रीम इलेव्हनच्या करारासंदर्भातील बीसीसीआयची भूमिकाही स्पष्ट केलीये. कायद्याची बारकाईने तपासणी करणे आवश्यक आहे. जर त्यातील तरतुदी स्पॉन्सरशिप  कायम ठेवण्याची परवानगी देत ​​असतील तर, ड्रीम ११ सोबतचा प्रायोजकत्व करार सुरू राहील. अन्यथा त्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले आहेत.

आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाच्या जर्सीवरून ड्रीम ११ नाव गायब होणार? 

याचा अर्थ जर हा करार  संपुष्टात आला तर बीसीसीआय टीम इंडियासाठी नव्या स्पॉन्सरचा शोध सुरु करु शकते. पण यासाठी किती वेळ लागणार? अन् डील कशी होणार ते पाहण्याजोगे असेल. जर तात्काळ करार संपुष्टात आला तर आशिया कप स्पर्धेसह महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाची जर्सीवरून ड्रीम ११ हे नाव गायब झाल्याचे दिसू शकते.    

ड्रीम ११ अन् बीसीसीआय यांच्यातील करार

बीसीसीआयने जुलै २०२३ ते मार्च २०२६ या कालावधीसाठी ड्रीम ११ सोबत ३५८ कोटी रुपयांचा करार केला आहे. या कराराच्या माध्यमातून ड्रीम ११ कंपनी टीम इंडियाची अधिकृत जर्सी प्रायोजक झाली. २०२३ च्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपासून टीम इंडियाच्या जर्सीवर ड्रीम ११ असे नाव दिसून येते. 

 

 

Web Title: BCCI secretary Devajit Saikia Dream 11 still Team India’s sponsor Or Not

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.