टी-२० आणि कसोटीतून निवृत्ती घेतल्यावर हिटमॅन रोहित शर्मासहविराट कोहलीच्या वनडे क्रिकेटमधील भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वनडेतून ही जोडी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहेत. BCCI नं शुबमन गिलकडे कर्णधारपद सोपवत वनडेतही नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या दोन दिग्गजांकडे गिलच्या नेतृत्वाखालील स्वत:च कर्तृत्व सिद्ध करून वनडे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत संघात टिकण्याचे चॅलेंज असणार आहे. इथं एक नजर टाकुयात रोहितचं मोठं स्वप्न भंगल्यापासून ते गिलच्या नेतृत्वाखाली या जोडीसमोर असलेल्या आव्हानासंदर्भात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टी-२० आणि मिनी वर्ल्ड कप जिंकले, पण वनडेचं स्वप्न अपूर्णच..
रोहित शर्मानं आपल्या फलंदाजीशिवाय कॅप्टन्सीची विशेष छाप सोडलीये. IPL मध्ये मुंबई इंडियन्सला पाचवेळा जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्मानं भारतीय संघाचे नेतृत्व करताना दोन आशिया कप स्पर्धेसह आयसीच्या दोन ट्रॉफी जिंकल्या आहेत. २०२४ मध्ये भारतीय संघाने त्याच्या नेतृत्वाखालील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. त्यानंतर मिनी वर्ल्ड कप स्पर्धा अर्थात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही भारतीय संघाने त्याच्या नेतृत्वाखाली जेतेपद मिळवले. पण टीम इंडियाची कॅप्टन्सी करताना वनडे वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्याची जी संधी गमावली ती आता पुन्हा येणार नाही. टी-२० आणि कसोटीतून निवृत्ती घेतल्यावर रोहित शर्मा २०२७ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत संघाचे नेतृत्व करत हे जेतेपद जिंकण्यासाचं स्वप्न बाळगून होता. पण कॅप्टन्सी बदलासोबत त्याचं हे स्वप्न भगलं आहे. आता वनडे वर्ल्ड कप संघात स्थान टिकवण्याचे त्याच्यासमोर आव्हान असेल.
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना रोहितसह विराट कोहलीसमोरही मोठं चॅलेंज
रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनीही पाठोपाठ टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धा ही २०२७ मध्ये होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन वनडे मालिकेसह भारतीय संघ या काळात फारच कमी वनडे खेळणार आहे. त्यामुळे टी-२० आणि कसोटीतून निवृत्ती घेत मध्यम मार्ग स्वीकारलेल्या जोडीसमोर या स्पर्धेपर्यंत संघात टिकून राहण्याचं एक मोठं चॅलेंज असेल. अल्प संधीत आपल्यातील धमक दाखवून देण्याचे चॅलेंज हे ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून सुरु होईल. गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना कोण कशी कामगिरी करणार ते पाहण्याजोगे असेल.