Join us  

सौरव गांगुलीमधला दिलदार माणूस; गरजूंना दान केले ५० लाख किमतीचे तांदूळ

क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल आणि अध्यक्ष अविशेक दालमिया यांनी पश्चिम बंगाल राज्य सरकारला अनुक्रमे २५ आणि ५ लाखांचा निधी देण्याचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 9:09 PM

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीमधला दिलदार माणूस बुधवारी पाहायला मिळाला. कोलकाता सरकारला मदत करण्यासाठी गांगुलीने नुकतंच इडन गार्डन स्टेडियम खुले करण्याचा प्रस्ताव ठेवला. याहीपुढे जात गांगुलीने कोलकातातील गरजूंना ५० लाख किमतीचे तांदूळ पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. 

गांगुली आणि लाल बाबा राईस यांनी पुढाकार घेताना गरजूंना मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेतला. या तांदूळासाठी जवळपास ५० लाख रुपये मोजले गेले आहेत. कोरोना व्हायरसपासून सुरक्षिततेसाठी राज्य सरकारच्या शाळांमध्ये ठेवण्यात आलेल्या गरजूंना हे धान्य देण्यात येणार आहे. गांगुलीच्या या पुढाकाराने अनेकजण पुढे येतील आणि मदत करतील,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल आणि अध्यक्ष अविशेक दालमिया यांनी पश्चिम बंगाल राज्य सरकारला अनुक्रमे २५ आणि ५ लाखांचा निधी देण्याचा निर्णय घेतला. 

कोरोना व्हायरसची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी केंद्र आणि सर्व राज्य सरकार प्रयत्न करत आहे. सोशल डिस्टन, सेल्फ आयसोलेशन, क्वारंटाईन ही पर्यायं जगभरात कोरोनाला रोखण्यासाठी वापरण्यात आली आहेत. भारतातही पुढील 21 दिवस संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. पण, अजूनही क्वारंटाईन सुविधांची उणीव जाणवत आहे. क्वारंटाईन लोकांना इतरांपासून दूर ठेवणं हे महत्त्वाचे पाऊल आहे. त्यासाठी आता गांगुली पुढे आला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना गांगुली म्हणाला,''राज्य सरकारने आम्हाला विचारणा केल्यास आम्ही इडन गार्डनवरील सुविधा त्यांना पुरवण्यास तयार आहोत. आम्हाला त्या घडीला जे करता येईल ते आम्ही करू. आमची काहीच हरकत नाही.''

अन्य महत्त्वाच्या बातम्या

लिओनेल मेस्सी अन् ख्रिस्तियानो रोनाल्डो यांंचा मदतीचा हात; सार्वजनिक हॉस्पिटलला कोट्यवधींची मदत

सानिया मिर्झाची समाजोपयोगी चळवळ; रोजंदारी कामगारांचे पोट भरण्याचा निर्धार

संपूर्ण देश लॉकडाऊन; आर अश्विननं जनतेला करून दिली 'त्या' प्रसंगाची आठवण

Video : शिखर धवन बनला धोबी... सायना नेहवालसह डेव्हिड वॉर्नर, मोहम्मद नबीकडून सांत्वन

पंतप्रधान मोदींच्या 'त्या' घोषणेनं IPL 2020च्या आशा मावळल्या? BCCIचं महत्त्वपूर्ण विधान

वा दादा... सरकारसाठी खुलं करणार इडन गार्डन मैदान; क्वारंटाईन लोकांच्या मदतीसाठी पुढाकार  

हरभजन सिंगनं केलं शाहिद आफ्रिदीचं कौतुक; कारण जाणून तुम्हीही ठोकाल कडक सॅल्यूट

याला म्हणतात देशसेवा... बांगलादेशच्या 27 क्रिकेटपटूंनी कोरोनाशी लढण्यासाठी दिला त्यांचा पगार

 

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यासौरभ गांगुली