Join us

ICC World Cup 2019 : टीम इंडियाची 'भगवी' जर्सी आली; बीसीसीआयकडून अधिकृत अनावरण

भारत आणि इंग्लंड यांचा सामना ३० जूनला होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ 'ऑरेंज जर्सी' परीधान करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 20:15 IST

Open in App

भारताने आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत निळ्या जर्सीनेच सर्व सामने खेळले आहेत. मात्र आता इंग्लंडच्या जर्सीचा रंग निळा असल्याने त्यांच्याविरोधात भारतीय संघाला निळ्या भगव्या जर्सीमध्ये खेळावे लागणार आहे. या जर्सीचे बीसीसीआयने नुकतेच अनावरण केले. 

भारत आणि इंग्लंड यांचा सामना ३० जूनला होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ 'ऑरेंज जर्सी' परीधान करणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) होम-अवे फॉरमॅटनुसार भारतीय संघाला दुसरी जर्सी तयार ठेवण्यास सांगितले होते. या भगव्या जर्सीचा ऑफिशिअल फर्स्ट लूक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

आतापर्यंत भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत निळ्या रंगाच्या शेड्सच्या जर्सी परीधान केल्या आहेत. पण इंग्लंडचीही जर्सी निळ्या रंगाची असल्यामुळे भारताला त्यांच्यी जर्सीचा रंग बदलावा लागणार आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघ निळ्या रंगाची जर्सी परीधान करत असला तरी कॉलर मात्र ऑरेंज रंगाची आहे. पण इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ही रंगसंगती उलटी होऊ शकते. इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाच्या जर्सीचे हात ऑरेंज रंगाचे असतील, तर कॉलर निळ्या रंगाची असेल. तसेच पाठीमागील भागही भगवा असणार आहे. 

भारतानेच का जर्सीचा रंग बदलायचा, इंग्लंडला सुट का? भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांच्या जर्सीचा रंग निळा आहे. त्यामुळे एका संघाला आपल्या जर्सीचा रंग बदलावा लागेल. पण यावेळी भारतानेच का जर्सीचा रंग बदलायचा, इंग्लंडने आपल्या जर्सीचा रंग बदलावा, असे काही जणांचे म्हणणे आहे. पण नियमानुसार यजमान संघाच्या जर्सीचा रंग बदलला जात नाही. त्यामुळे इंग्लंडला यामधून सुट मिळाली आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा संघ निळ्या जर्सीमध्येच उतरणार आहे.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघवर्ल्ड कप 2019