टीम इंडियासाठी कायपण! किंग कोहली विचार बदलून कसोटी खेळण्यासाठी तयार होणार?

बीसीसीआयने कोहलीला टीमसोबत कायम राहण्याची विनंती केली असून तो काय निर्णय घेणार? ते पाहण्याजोगे असेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 18:26 IST2025-05-10T18:23:08+5:302025-05-10T18:26:56+5:30

whatsapp join usJoin us
BCCI Official Breaks Silence On Virat Kohli Considering Test Retirement Requested | टीम इंडियासाठी कायपण! किंग कोहली विचार बदलून कसोटी खेळण्यासाठी तयार होणार?

टीम इंडियासाठी कायपण! किंग कोहली विचार बदलून कसोटी खेळण्यासाठी तयार होणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यासंदर्भातील गोष्ट बीसीसीआयला कळवली. स्टार क्रिकेटरने सार्वजनिकरित्या यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी ही गोष्ट खरी असल्याची पुष्टी झाली आहे. बीसीसीआयने कोहलीला टीमसोबत कायम राहण्याची विनंती केली असून तो काय निर्णय घेणार? ते पाहण्याजोगे असेल.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

कोहलीला मनवण्यासाठी खास बैठक

आयएएनएसच्या वृत्तानुसार, कोहलीच्या निवृत्तीसंदर्भातील मुद्यावर बीसीसीआयचा एक अधिकारी म्हणाला आहे की, विराट कोहली अजूनही फिट आहे. आजही त्याच्यात धावांसाठी भूक दिसून येते. ड्रेसिंग रुममधील त्याची उपस्थिती संघाचे मनोबल वाढवणारी ठरते. त्यामुळेच आम्ही त्याला निर्णयावर पुन्हा विचार करण्याची विनंती केली आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी २३ मे रोजी टीम इंडियाची घोषणा करण्यात येणार आहे. त्याआधी बीसीसीआय निवडकर्यांची एक खास बैठक होणार असून या बैठकीत विराट कोहलीसोबत चर्चा करण्यात येणार असल्याचे समजते. विराट कोहलीचं मनं वळवण्यात बीसीसीआय यशस्वी ठरले तर इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाला तो एक मोठा दिलासा असेल.

रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती

इंग्लंड दौऱ्याआधी एक धक्का बसलाय, आता कोहलीची निवृत्ती परवडणारी नाही

विराट कोहलीनं १२३ कसोटीतील २१० सामन्यात ९२३० धावा केल्या आहेत. या फॉर्मेटमध्ये कोहलीच्या खात्यात ३१ अर्धशतकासह ३-० शतकांची नोंद असून सर्वाधिक ७ द्विशतकेही त्याच्या नावे आहेत. आधीच रोहित शर्मानं घेतलेली निवृत्ती त्यात कोहलीची भर पडली तर   इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाच्या अडचणीत भर पडू शकते. टीम इंडियाचा विचार करून तो सकारात्मक निर्णय घेईल, अशी बीसीसीआयला अपेक्षा असेल. 

Web Title: BCCI Official Breaks Silence On Virat Kohli Considering Test Retirement Requested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.