Join us

BCCI Men's Vs women's Central Contract: 'C' गटातील पुरुष क्रिकेटपटूही 'A' गटातील महिला खेळाडूंपेक्षा कमावतो ५० लाख अधिक; पाहा BCCIच्या करारातील ही तफावत

BCCI Men's Vs women's Central Contract: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या BCCIने वार्षिक करार जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 12:08 IST

Open in App

BCCI Men's Vs women's Central Contract: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या BCCIने वार्षिक करार जाहीर केले. पुरूषांच्या वार्षिक करारात अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या अनुभवी खेळाडूंसह हार्दिक पांड्याचे डिमोशन झाले. रहाणे व पुजारा अ गटातून ब गटात गेले, तर हार्दिक अ गटातून थेट क गटात फेकला गेला. पण, तरीही भारतीय महिला क्रिकेटपटूंपेक्षा या खेळाडूंना मिळणारा वार्षिक पगार यात प्रचंड तफावत पाहायला मिळत आहे. ही तफावत काही नवीन गोष्ट नाही, परंतु वर्षानुवर्षे दिल्या जाणाऱ्या या तुटपुंज्या पगारात काहीतरी वाढ होईल, अशी अपेक्षा होती.

पुरुष क्रिकेटपटूंना मिळालेला करार...

A+ गटात विराट कोहली, जसप्रीत बुमराह  व रोहित शर्मा हे कायम आहेत आणि त्यांना ७ कोटी मानधन मिळणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर तंदुरुस्तीच्या कारणामुळे संघाबाहेर असलेल्या हार्दिक पांड्यालाही फटका बसला. हार्दिकला A गटातून थेट C गटात पाठवले गेले आणि आता त्याला ५ कोटींएवजी १ कोटीच पगार मिळेल. श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळल्यानंतर बीसीसीआयशी थेट पंगा घेणाऱ्या यष्टिरक्षक वृद्धीमान सहाला B गटातून C गटात स्थान मिळाले. भुवनेश्वर कुमार व उमेश यादव यांचेही डिमोशन झाले. कुलदीप यादव व नवदीप सैनी यांना करार देण्यात आलेला नाही. 

A + ( ७ कोटी) - विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा

A ( ५ कोटी) - आर अश्विन, रवींद्र जडेजा,लोकेश राहुल, मोहम्मद शमी, रिषभ पंत

B  ( ३ कोटी)  - चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा

C ( १ कोटी) - शिखर धवन, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, शुबमन गिल, हनुमा विहारी, युझवेंद्र चहल, वृद्धीमान सहा, सूर्यकुमार यादव, मयांक अग्रवाल 

महिला क्रिकेटपटूंना मिळालेले करार

A ( ५० लाख) - हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, पूनम यादव, दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड

B ( ३० लाख) - मिताली राज, झुलन गोस्वामी, तान्या भाटीया, शफाली वर्मा, पूजा वस्त्राकर

C ( १० लाख) - पूनम राऊत, शिखा पांडे, जेमिमा रॉड्रीग्ज, रिचा घोष, हर्लीन देओल, अरुंधती, स्नेह.  

 

टॅग्स :बीसीसीआयविराट कोहलीस्मृती मानधनामिताली राज
Open in App