BCCI Serious Injury Replacement Rule After Rishabh Pant Injury : इंग्लंड दौऱ्यावरील मँचेस्टर कसोटी सामन्यात पाय फॅक्चर असताना रिषभ पंत मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. लंगडत-लंगडत तो मैदानात उतरला अन् त्याच्या या लढवय्या वृत्तीनं सर्वांची मनं जिंकली. पण त्यानंतर आयसीसीच्या नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले. 'कन्कशन सब्स्टीट्यूट' प्रमाणेच गंभीर दुखापतीसाठीही लाइक टू लाइक रिप्लेसमेंटचा पर्याय असायला हवा. आयसीसीने नियमात सुधारणा करण्याची गरज आहे, असे मत लिटल मास्टर सुनील गावसकरांनीही मांडले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
BCCI नं ती गोष्ट मनावर घेतली
ICC नं यावर निर्णय घेण्याआधी BCCI नं नियमातील त्रूटी भरून काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आगामी देशांतर्गत हगामात बदली खेळाडूसंदर्भातील नावा नियम लागू होणार असून कोणत्याही विकेट किपर बॅटरवर आता पंतसारखी वेळ येणार नाही. जाणून घेऊयात नव्या नियमासंदर्भातील सविस्तर
साक्षीसोबतच्या लव्हली फोटोपेक्षा MS धोनीची गंभीरसोबतची 'फ्रेम' ठरतीये लक्षवेधी
...तर बदली खेळाडूचा नियम वापरता येणार नाही
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०२५-२६ च्या हंगामातील बहु दिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी गंभीर दुखापतीच्या परिस्थितीत बदली खेळाडूचा नियम लागू केला आहे. हा नियम 'कन्कशन सब्स्टीट्यूट'प्रमाणेच बदली खेळाडूची परवानगी देणारा आहे. नव्या नियमानुसार, देशांतर्गत सामन्यादरम्यान जर एखाद्या खेळाडूला गंभीर दुखापत झाली तर त्या खेळाडूच्या रुपात बदली खेळाडूची परवानगी दिली जाईल. पण जर मैदानाबाहेर खेळाडूला दुखापत झाली तर मात्र हा बदली खेळाडू देता येणार नाही.
खेळाडूची दुखापत गंभीर आहे ते कोण अन् कसं ठरवणार?
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, बदली खेळाडू संदर्भातील अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा सामनाधिकाऱ्यांकडे असेल. मैदानातील पंच, संबंधित मेडिकल टीमशी संलग्नित डॉक्टर यांच्यासोबत चर्चा करून सामनाधिकारी दुखापतीची तीव्रता काय हे समजून घेऊन बदली खेळाडू द्यायचा की नाही यासंदर्भातील निर्णय घेतील.
BCCI चा प्रयोगानंतर ICC कडूनही उचललं जाऊ शकते हेच पाऊल
क्रिकेटच्या मैदानात सामन्या दरम्यान खेळाडूला झालेल्या दुखापतीनंतर अनेकदा संघावर १० खेळाडूंसह खेळण्याची वेळ आली आहे. डोक्याच्या भागात चेंडू लागल्यावर लाइक टू लाइक रिप्लेसमेंट मिळते. पण अन्य परिस्थितीत हा नियम लागू नाही. बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये हा नियम लागू केल्यावर येत्या काळात आयसीसीकडूनही यावर विचार केला जाऊ शकतो. हा निर्णय प्रत्येक संघासाठी गरजेचा आहे.