Join us  

समालोचकांच्या यादीतून BCCIने 'या' माजी क्रिकेटपटूची केली हकालपट्टी

भारत आणि दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्या वन डे सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. मात्र या सामन्याच्या दरम्यान समालोचक करण्यासाठी सुनील गावस्कर, लक्ष्मण शिवरामकृष्णन आणि मुरली कार्तिक उपस्थित होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 4:07 PM

Open in App

भारताचा माजी कसोटी क्रिकेटपटू आणि अनुभवी समालोचक संजय मांजरेकर यांची बीसीसीआयच्या समालोचकांच्या यादीमधून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

भारत आणि दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्या वन डे सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. मात्र या सामन्याच्या दरम्यान समालोचक करण्यासाठी सुनील गावस्कर, लक्ष्मण शिवरामकृष्णन आणि मुरली कार्तिक उपस्थित होते. परंतु यावेळी संजय मांजरेकर उपस्थित नसल्यामुळे विविध चर्चा रंगू लागल्या होत्या. यानंतर मुंबई मिररने दिलेल्या वृत्तामध्ये संजय मांजरेकर यांनी बीसीसीआयच्या समालोचकांच्या यादीमधून वगळण्यात आल्याचे सांगितले आहे.

संजय मांजरेकर यांनी समालोचन करत असताना भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाचा अपमान केला होता. तसेच समालोचक आणि क्रिकेट विश्लेषक हर्षा भोगले यांचाही अपमान केल्यामुळे बीसीसीआयने संजय मांजेकर यांना समालोचकांच्या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. 

भारत-बांगलादेश यांच्यात झालेल्या दिवस-रात्र मालिकेदरम्यान संजय मांजरेकर यांनी जडेजावर टीका केली होती. रवींद्र जडेजा हा एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत नाही. असे कधी तरी खेळणारे खेळाडू मला आवडत नाहीत. त्याचबरोबर, तो कसोटी सामन्यात पूर्ण गोलंदाज आहे. 50 षटकांच्या क्रिकेटसाठी मी प्लेइंग इलेव्हनमध्ये दुसऱ्या कोणत्या तरी फलंदाज किंवा कोणत्याही फिरकी गोलंदाजाचा समावेश करू इच्छितो, पण जडेजाचा नाही", अशा शब्दात संजय मांजरेकर यांनी जडेजावर टीका केली होती. 

टॅग्स :बीसीसीआयभारतभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका