Join us

बीसीसीआयने आमंत्रित केले नाही; कपिल देव यांची स्पष्ट नाराजी

सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 05:46 IST

Open in App

अहमदाबाद : भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांनी एक मोठे विधान केले आहे. २०२३ च्या फायनलसाठी बीसीसीआयने माझ्यासह ८३ च्या संघातील सर्वांना आमंत्रित करणे अपेक्षित होते पण त्यांनी कोणालाच बोलवले नाही, अशी खदखद कपिल देव यांनी व्यक्त केली.

सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी सांगितले की, मुलाखतीसाठी तुम्ही मला बोलावले आणि मी इथे आलो. पण बीसीसीआयने बोलावलेच नाही. खरं तर १९८३ चा संपूर्ण संघ तिथे बोलवायला हवा होता असे मला वाटते. पण, आता सर्वकाही वेगळे असून काही लोक मागील गोष्टी विसरत आहेत. कपिल देव यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने १९८३ मध्ये बलाढ्य वेस्ट इंडीजला चितपट करून विश्वचषक उंचावला होता.

टॅग्स :कपिल देववन डे वर्ल्ड कप