Join us

BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांना मिळाला डिस्चार्ज; पण...

Sourav Ganguly gets discharge : सौरव गांगुली यांना हार्ट अॅटॅक आला होता. गांगुली यांच्यावर याच महिन्यात दोनदा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. पहिल्या अँजिओप्लास्टीवेळी गांगुली एकदम ठीकठाक वाटत होते. त्यांनी आयपीएलच्या तयारीचा आढावादेखील घेतला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 13:07 IST

Open in App

हृदयविकाराच्या त्रासामुळे एकाच महिन्यात दुसऱ्यांदा रुग्णालयात भरती झालेले BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. 27 जानेवारीला त्यांना कोलकाताच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

सौरव यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. घरी जाऊ दिलेले असले तरीही त्यांना डॉक्टरांनी एका आठवड्याची सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले आहे. गेल्या वेळी गांगुली यांनी ही विश्रांती घेतली नव्हती आणि आयपीएलच्या नियोजनाला लागले होते. 

सौरव गांगुली यांना हार्ट अॅटॅक आला होता. गांगुली यांच्यावर याच महिन्यात दोनदा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. पहिल्या अँजिओप्लास्टीवेळी गांगुली एकदम ठीकठाक वाटत होते. त्यांनी आयपीएलच्या तयारीचा आढावादेखील घेतला होता. मात्र, काही दिवसांनी पुन्हा छातीत दुखू लागल्याने पुन्हा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. 2 जानेवारीला त्यांना हार्ट अॅटॅक आला होता. तेव्हा त्यांना कोलकाताच्या वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 

सौरव गांगुलीच्या जवळच्या व्यक्तीने एएनआयसोबत बोलताना सांगितले, की 'गांगुलीची अॅन्जिओप्लास्टी यशस्वीपणे पार पडली आहे. दोन स्टेंट लावण्यात आल्या आहेत'. सौरव गांगुलीला अपोलो रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. यानंतर त्याची दुसऱ्यांदा अॅन्जिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

'या' गंभीर आजाराशी लढतोय सौरव गांगुलीडॉक्टरांनुसार, दादाला ट्रिपल वेसल डिजीजची समस्या आहे. भारतातील प्रसिद्ध हार्ट स्पेशालिस्ट डॉ. देवी शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सौरव गांगुलीची अ‍ॅंजियोप्लास्टी करण्यात आली. देवी शेट्टी मेडिकल सायन्सच्या विश्वातील एका प्रसिद्ध नाव आहे. ते एक कार्डियाक सर्जन असून २०१२ मध्ये त्यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मेडिकल एक्सपर्टनुसार, हा आजार कोरोनरी आर्टरी डिजीजचं एका फार घातक रूप आहे. हृदयात रक्त पोहोचवण्याचं काम ३ मोठ्या धमण्या करतात आणि जेव्हा या तिन्ही धमण्या ब्लॉक होतात तेव्हा याला ट्रिपल वेसेल डिजीज अशा नावाने ओळखलं जातं. यामुळे छातीत वेदना, श्वास घेण्यास त्रास होतो. ज्याचा परिणाम हार्ट अटॅक येतो.

टॅग्स :सौरभ गांगुलीहॉस्पिटलबीसीसीआय