IPL 2025 New Rules: यंदाच्या IPL ला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी यंदाच्या हंगामात होणाऱ्या बदलांबाबत काल एक बैठक घेण्यात आली. BCCI च्या बैठकीत काही बदललेल्या नियमाबाबत निर्णय घेण्यात आले. IPL 2025 मध्ये नियमात मोठा बदल झाला असून, ११व्या पटकापासून संघांना दुसरा नवीन चेंडू घेता येईल. बीसीसीआयने नियमाला मंजुरी प्रदान केली आहे. या नियमानुसार दुसऱ्या डावात नचा चेंडू वापरता येईल. धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांना फलंदाजी दरम्यान दवबिंदूचा अनावश्यक लाभ होऊ नये, यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. यामुळे ११च्या षटकात नवा चेंडू गोलंदाजांना व्यवस्थित पकडणे सोपे होईल आणि दवबिंदूपासून मुक्ती मिळेल.
क्रिकबझच्या मते, गुरुवारी आयपीएल २०२५च्या कर्णधारांच्या बैठकीत नवीन नियमांवर चर्चा झाली. सर्व कर्णधारांना दुसऱ्या चेंडू नियमांबद्दल माहिती देण्यात आली. तथापि, हा अनिवार्य नियम असणार नाही. उलट, दुसरा चेंडू घेण्याची परवानगी द्यायची का, हे पंच ठरवू शकतील. चेंडू बदलायचा की नाही, हे पंचांनी ठरवावे. ते दवबिंदूच्या स्थितीच्या आधारावर निर्णय घेतील, असे सूत्राने सांगितले. हा नियम फक्त दुसऱ्या डावातच लागू होईल. चेंडू बदलायचा की नाही, नवा चेंडू द्यायचा की नाहीं. है पंच ठरवतील. चेंडू बदलण्याचा निर्णय दवबिंदूच्या स्थितीवर आधारित असेल. दुपारच्या सामन्यामध्ये हा नियम लागू होण्याची शक्यता नाही. केवळ सायंकाळच्या सामन्यासाठी हा नियम अमलात आणला आईल.
चेंडूवर लाळ लावण्यास पुन्हा परवानगी; सर्व संघांच्या कर्णधारांमध्ये झालेल्या सहमतीनंतर उठवली बंदी
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) कर्णधारांच्या सहमतीनंतर आगामी सत्रात चेंडूवर लाळ लावण्यावरील बंदी उठविण्याचा निर्णय घेतला, कोरोना काळानंतर लाळेचा वापर पुन्हा सुरू करणारी आयपीएल ही सर्वांत पहिली मोठी स्पर्धा ठरली आहे. शनिवारपासून सुरू होणान्या आयपीएलच्या आगामी सत्राच्या आधी मुंबईत कर्णधारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, लाळेवरील बंदी हटवण्यात आली आहे. सर्वाधिक कर्णधार या निर्णयाच्या बाजूने होते. काही कर्णधारांना लाळेचा वापर पुन्हा सुरु करण्याबाबत साशंकता होती. काही कर्णधार तटस्थ राहिले; पण सर्वाधिक कर्णधारांनी या निर्णयाला पाठिंबा दर्शविला. मुंबईत बीसीसीआय कार्यालयात दुपारी १२:३० वाजता बैठक सुरू होणार होती पण, काही संघ अधिकारी उशिरा पोहोचल्यामुळे बैठक वेळेवर सुरू होऊ शकली नाही.
कधी घातली होती बंदी?
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कोरीनाकाळात खबरदारी म्हणून चेंडूला चकाकी आणण्यासाठी वापरात येणाऱ्या लाळेवर बंदी घातली होती. वर्षांनुवर्षे सुरू असलेला हा प्रकार २०२२ मध्ये कायमचा बंद करण्यात आला. कोरोनानंतर आयपीएलने ही आयसीसी निर्बंधांचा स्पर्धेत समावेश केला होता. परंतु, त्याची मार्गदर्शक तत्त्वे खेळाच्या प्रशासकीय मंडळाच्या कक्षेबाहेर आहेत.
आयसीसीही करणार विचार?
आता आयपीएलमध्ये लाळेचरील बंदी हटवण्यात आल्याने आयसीसीदेखील या विषयावर आपल्या भूमिकेची चाचपणी करू शकते. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा वरिष्ठ वेगवान गोलंदाज मोहम्मद समीने चेंडूवर लाळेचा वापरण्याची गरज असल्याचे सांगितले होते. अन्यथा सामना पूर्णपणे फलंदाजांच्या बाजूने झुकेल, दक्षिण आफ्रिकेचा व्हनॉन फिलैंडर आणि न्यूझीलंडचा टीम साऊदी यांनीही शमीचे समर्थन केले होते.
वाईड बॉलचा नियम
बीसीसीआयने उंचावरून जाणारा वाइड चेंडू आणि ऑफ स्टम्पबाहेरच्या वाइड चेंडूसाठी डीआरएसच्या वापरास मंजुरी दिली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, ऑफ स्टम्पबाहेरच्या वाइड आणि उंच वाइड चेंडूवर निर्णय घेण्यासाठी हॉक आय आणि बॉल ट्रेकिंगचा वापर करण्यात येणार आहे.
संध्याकाळच्या सामन्यात दुसऱ्या डावात दव पडत असल्यास ११व्या षटकानंतर चेंडू बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा नियमांमधील बदल नाही, तर सर्व संघ आणि पंचांमधील परस्पर समजूतदारपणा आहे. जर चेंडू जीर्ण झाला असेल तर बदली चेंडूही वापरता येईल, असाही निर्णय घेतला गेला आहे.
इम्पॅक्ट प्लेअरबाबतही चर्चा
कर्णधारांच्या बैठकीच्या अजेंड्यावर वादग्रस्त 'इम्पॅक्ट प्लेअर' हा नियम होता, जो बीसीसीआयने आधीच किमान २०२७ पर्यंत वाढविला आहे. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांसारख्या खेळाडूंनी या नियमावर आधीच नाराजी व्यक्त केली आहे. अधिकान्याने सांगितले की, काही जणांनी 'इम्पेक्टप्लेअर' नियमावर आक्षेप घेतला असला तरी त्यामुळे अनकैप फलंदाज आणि गोलंदाजांना फायदा झाला आहे.