BCCI Awards Shubman Gill Cricketer of the Year: भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल याच्यासाठी हे वर्ष अत्यंत खास ठरणार आहे. २०२५-२६ या वर्षात मैदान गाजवल्याबद्दल बीसीसीआयने त्याला 'सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू' (Cricketer of the Year) म्हणून निवडले आहे. तसेच, भारतीय क्रिकेटमधील 'द वॉल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडला क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी मानाचा जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे.
बीसीसीआयचा हा वार्षिक सोहळा भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जातो. शुभमन गिलसारख्या युवा खेळाडूचा सन्मान होणे हे भारतीय क्रिकेटच्या नव्या युगाची नांदी मानली जात आहे. गेल्या वर्षभरात शुभमन गिलने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. त्याची सातत्यपूर्ण कामगिरी आणि नेतृत्वगुण पाहून बीसीसीआयने त्याला हा सर्वोच्च बहुमान देण्याचे जाहीर केले आहे. मागील वर्षी हा पुरस्कार जसप्रीत बुमराहला मिळाला होता. या सोहळ्यात केवळ वरिष्ठ खेळाडूच नव्हे, तर स्थानिक क्रिकेट (रणजी ट्रॉफी) आणि महिला क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाही गौरव केला जाणार आहे.
राहुल द्रविडला 'लाईफटाईम अचिव्हमेंट'
भारताचे माजी कर्णधार आणि विश्वविजेत्या टी२० संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना 'सी.के. नायडू लाईफटाईम अचिव्हमेंट' पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला होता. राहुल द्रविड यांचा सन्मान झाल्यास मंडळाने त्यांच्या निवृत्तीनंतरच्या प्रवासाला कृतज्ञतेने सलाम केला आहे. हा सोहळा मुंबईत लवकरच पार पडणार असून, यामध्ये क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
टी२० विश्वविजेत्या संघाचा सत्कार
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली नुकताच तिसऱ्यांदा टी२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा या सोहळ्यात विशेष गौरव केला जाणार आहे. यावेळी 'व्हिक्टरी परेड' होऊ शकली नसल्याने, बीसीसीआय या कार्यक्रमात खेळाडूंचे जंगी स्वागत आणि सत्कार करणार आहे.
Web Summary : Shubman Gill named 'Cricketer of the Year' by BCCI for 2025-26. Rahul Dravid receives Lifetime Achievement award for contributions to Indian cricket. T20 World Cup winning team to be honored at Mumbai event.
Web Summary : शुभमन गिल 'क्रिकेटर ऑफ द ईयर' नामित; राहुल द्रविड़ को बीसीसीआई द्वारा लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार। टी20 विश्व कप विजेता टीम को मुंबई में सम्मानित किया जाएगा।